Monday, March 29, 2021

रविकिरण मंडळ, १९२३...Manoramabai Ranade, Natyachhatakar Diwakar

बा. सी. मर्ढेकर यांच्या 'मर्ढेकरांची कविता' या- प्रथम १९५९ साली प्रकशित झालेल्या- पुस्तकात त्यांच्या तीन पुस्तकातील कविता एकत्र केल्या गेल्या आहेत (शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता) .. 
 
त्यातल्या शिशिरागम या स्वतंत्र पुस्तकाचे प्रास्ताविक - 'उत्तरवारा म्हणाला-----'- लिहले होते - श्रीधर बाळकृष्ण रानडे यांनी ... (मला ते आवडते)... 
 
ते माझ्याकडील 'मर्ढेकरांची कविता' च्या १९७७ मौज प्रकाशनाच्या आवृत्तीत परिशिष्टांत समाविष्ट केले आहे... 
 
कोण हे रानडे? सोबतच्या रविकिरण मंडळ, १९२३ या फोटोत, त्यांचा आणि -ह्या फोटोनंतर २ वर्षांत वारलेल्या - त्यांच्या पत्नी यांचे फोटो पहा...मनोरमाबाई रानडे बीए होत्या... देशस्थ ब्राह्मण होत्या,,. रविकिरण मंडळातील त्या एकमेव स्त्री दिसत आहेत,,,१९२५ साली वारल्या,
 
त्यांचे कोकणस्थ मुलाशी (श्री बा रानडे) झालेले लग्न आणि माधव जूलियन यांचे कु गंगु गरुड (नंतरच्या सौ लीलाबाई पटवर्धन) या देशस्थ ब्राह्मण मुलीशी झालेले लग्न त्यावेळी वादाचे आणि चर्चेचे विषय होते... (त्या काळात अशी लग्न करून एक लुटुपुटुची क्रांती केल्याची भावना आणि समाधान तरुणाईला कदाचित मिळत असावी. कारण ह्या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमीआहे, २०व्या शतकाच्या पहिल्या भागाच्या भयानक, रक्तरंजित, उलथापालथीच्या  भारताच्या आणि जगाच्या इतिहासाची.)
 
 लीलाबाई पुस्तकात लिहतात मनोरमाबाई हुशार होत्या, माधव जूलियन त्यांच्याबद्दल बरेच कौतुकाने बोलत असत पण ते काय बोलत ह्या बद्दल एक अक्षर सुद्धा त्या लिहीत नाहीत , ना त्यांचे स्वतःचे मनोरमाबाई बद्दलचे मत त्या व्यक्त करतात. 
 
गं. दे. खानोलकर यांच्या 'माधव ज्यूलियन', १९५१/१९६८ पुस्तकांत रानडे दांपत्याबद्दल पुष्कळ माहिती आहे. त्यातील एक लांबट उतारा इथे देतो. मनोरमाबाई वारल्यावर माधवराव लिहतात :
 
 मनोरमाबाईंबद्दलची माहिती,  त्यांचा फोटो आणि झालेला अकाली मृत्यू हे सगळे चटका लावून जाते. 
 
डावीकडून दुसरे, जमिनीवर बसलेले, दिवाकर ... आज मार्च २०२१ मध्ये, दिवाकर काही प्रमाणात सोडले तर सगळे मंडळ (दोन चार  कविता सोडल्यातर, अगदी brilliant माधव जूलियन सुद्धा) जवळ जवळ जनमानसातून अदृश्य झाले आहे ...आज त्यातील कोणाचीच पुस्तके बाजारात सहजपणे मिळत नाहीत....
 
श्रीमती पटवर्धन यांच्या पुस्तकात दिवाकरांचा क्वचितच उल्लेख आहे पण आज तोच 'किरण' थोडाफार लुकलुकतो आहे! (दिवाकर रविकिरण मंडळात पहिल्यांदा खूप active होते , नंतर ते त्यांच्या 'सोवळ्या' प्रकृतीमुळे दूर होत गेले.)
 
 
(हे चित्र साभार घेतले आहे, 'आमची अकरा वर्षे' ह्या लीलाबाई पटवर्धन यांच्या १९४५/१९९४ सालच्या पुस्तकातून... )

Thursday, March 25, 2021

१८५७-१९४६ या काळातील तीन लक्ष्मी...राणी लक्ष्मी, कॅप्टन लक्ष्मी, विजयालक्ष्मी

वाङ्मयशोभेच्या "तीन लक्ष्मी" अंकाला या महिन्यात ७५वर्षे पूर्ण झाली 

१८५७-१९४६ या काळातील तीन लक्ष्मी ... राणी लक्ष्मी, कॅप्टन लक्ष्मी, विजयालक्ष्मी



सौजन्य: वाङ्मय शोभा, मार्च १९४६

सौजन्य: कवी मनमोहन

Wednesday, March 24, 2021

Possible Scietific Questions and the Problems of Life...Wittgenstein's Tractatus Logico-Philosophicus@100

या पुस्तकातील  माझे अत्यंत आवडणारे quote :  We feel that even if all possible scientific questions be answered, the problems of life have still not been touched at all.”

प्राध्यापक सुधीर बोस (S K Bose) यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये १९४० साली   द फिलॉसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. प्रा बोस हे Wittgenstein यांचे विद्यार्थी होते, ज्यांच्या ( Wittgenstein)  Tractatus Logico-Philosophicus ला २०२१ साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

 रे मॉंक त्यांच्या 'Ludwig Wittgenstein: The Duty of Genius' गाजलेल्या पुस्तकात लिहतात :

“…Many who had heard of Wittgenstein as the author of Tractatus Logico-Philosophicus imagined him to be an old and dignified German academic, and were unprepared for the youthfully aggressive and animated figure they encountered at meetings of the Moral Science Club. S. K. Bose, for example, who subsequently became one of the circle of Wittgenstein’s friends and admirers, recalls:

My first encounter with Wittgenstein was at a meeting of the Moral Science Club at which I read a paper on ‘The nature of moral judgement’. It was a rather largely attended meeting and some people were squatting on the carpet. Among them was a stranger to all of us (except, of course, Professor Moore and one other senior member possibly present). After I had read the paper, the stranger raised some questions and objections in that downright fashion (but never unkind way) which one learned later to associate with Wittgenstein. I have never been able to live down the shame I felt when I learnt, some time later, who my interlocutor had been, and realised how supercilious I had been in dealing with the questions and objections he raised."


 

Tuesday, March 23, 2021

Elizabeth Taylor, 10th Death Anniversary

#ElizabethTaylor10thDeathAnniversary

Elizabeth Taylor in "BUtterfield 8", 1960

Monday, March 22, 2021

World Water Day

Today March 22 is World Water Day


Artist: Bob Mankoff

Sunday, March 21, 2021

माधव जूलियन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि शेक्सपिअर, १९२५...The Year of Lear



(वरील कविता बा सी  मर्ढेकरांची, असंग्रहित)

माधव जूलियन यांनी ११ ऑक्टोबर १९२५ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा दिला. ते त्याच दिवशी संध्याकाळी कवि गिरीश यांच्याकडे गेले होते. त्यांची मनस्थिती अत्यंत वाईट होती. 

त्यांनी गिरीश यांच्या कडून शेक्सपिअर चे किंग लिअर नाटक घेऊन , एका पानावर थांबून , हा भाग मोठ्याने म्हटला:  

Thou rascal beadle, hold thy bloody hand.

Why dost thou lash that whore? Strip thine own back.

Thy blood as hotly lusts to use her in that kind

For which thou whip’st her. The usurer hangs the cozener.

Through tattered clothes great vices do appear;

Robes and furred gowns hide all. Plate sin with gold,

And the strong lance of justice hurtless breaks.

Arm it in rags, a pigmy’s straw does pierce it.  
 

(20.154–59)

वाचून होताच पुस्तक भिंतीवर फेकून मारले आणि म्हणाले 'That's why Shakespeare is great'... 

(' माधव जूलियन', ले: गं. दे. खानोलकर, १९५१-१९६८, पृष्ठे: १५१-१५२)

 विशेष म्हणजे शेक्सपिअर यांचे मोठे अभ्यासक James Shapiro त्यांच्या 'The Year of Lear: Shakespeare in 1606', २०१५ या पुस्तकात सुद्धा ह्याच ओळींबाबत लिहतात:

"... Shakespeare’s engagement with Harsnett’s book (In 1603, Samuel Harsnett wrote a book, A Declaration of Egregious Popish Impostures which condemned exorcisms performed by Roman Catholic priests in the 1580s. Shakespeare used this book as a source, pulling words and phrases when writing the play King Lear)  deepens over the course of King Lear. The abuse of authority, so transparent in page after page of the Declaration, is a kind of nightmare that Lear at last comes to recognize. For Lear—and for playgoers—at play’s end, authority is shown to be arbitrary, its “great image” a beggar running from a barking dog (20.149–53). In what is arguably the most explicit piece of social criticism in all of his work, Shakespeare has Lear conclude that violence, deception, and hypocrisy in the kingdom are endemic... 

There is the evil that stems from the abuse of authority and there is another kind that cannot be so easily explained by self-interest and the human propensity for cruelty. In King Lear, Shakespeare wrestles with the nature of this kind of evil as well, something that Harsnett, in a book about the demonic, takes as a given but never confronts. Historical events would soon ensure that this question would take on even greater relevance as Shakespeare was finishing King Lear that winter. And he wasn’t done with Harsnett quite yet, or with questions of possession, bewitching, or where evil originates."

खानोलकरांचे पुस्तक वाचून आपल्याला पुरेपूर खात्री पटते की माधव जूलियन यांना त्यांची त्यावेळची स्थिती वर्णायला किंग लिअर पेक्षा चांगले उदाहरण सापडले नसते, आज आपल्याला २०२१ साली सुद्धा सापडणार नाही.... 

"Shakespeare has Lear conclude that violence, deception, and hypocrisy in the kingdom are endemic... " तुम्ही वेगळा निष्कर्ष काढू शकता काय?