" १- व्हॅन गाॉव
मी
व्हॅन गाॉव् ...
मी
सूर्यफुलांच्या शय्येवर
निजलों एका वेश्येला घेऊन
अन् दिला तिला
माझाच एक कान कापून ...
ई ऽ ऽ ऽ ऽ
अखेर हिरव्या सांवल्यांच्या डोहांत
आत्महत्या केली मीं
तिची मी
उन्हाची
पिवळीजर्द ... विवस्त्र किंकाळी ऐकून
... "
(पृष्ठ ११-१२, , 'निवडक सदानंद रेगे', संपादक : वसंत आबाजी डहाके , १९९६-२०१३)