Friday, December 11, 2020

जी ए कुलकर्णीं स्मृतिदिन....The Best Doctor by Alfred Kubin

#जीएकुलकर्णींस्मृतिदिन 

आज डिसेंबर ११ २०२०, जी ए कुलकर्णींचा ३३वा स्मृतिदिन

जी ए कुलकर्णी, 'घऱ', पृष्ठ २१८, 'पिंगळावेळ', १९७७:
"...  तिला एकदा तिचे घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केंव्हा का बंद पडेना ते ! मग शेजारी सिगरेटचे एक पूर्ण पाकीट असावे. एखादा दरबारी छबिना  चौघडे-तुताऱ्या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेंपरेकोर्डवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात निःसंकोच सरदारी दिमागाने चित्रे आणि लेख छापणारे 'National Geographic' किंवा 'Realities'- सारखे एखादे मासिक हातात असावे . मग बोलावणे येऊन घेणाऱ्या , तू कसाही ये. तू दार ठोठावून ये. अगर आडदांडासारखा आत शीर.  असल्या एका सिगरेट मधून आलास तरी चालेल- नव्हे तू तसाच ये ! ते मलादेखील फार आवडेल ! ..."


Alfred Kubin, The Best Doctor, c. 1901

Hilary Ilkay, Lapham's Quarterly, December 2013
"....symbolist painter and writer Alfred Kubin strips death of any disguise in his pen-and-ink drawing, The Best Doctor. Composed between 1901 and 1902, Kubin’s creation is eerily hermaphroditic: the bare skull sprouts tufts of straggly long hair and the body is an amalgamation of masculine muscular arms and a flat chest with sharply exaggerated feminine curves, outlined by a tight black dress. It could almost be described as a figure in drag. The drawing is a dark reflection on humans’ trust in the saving powers of medicine. Death, supposedly “the best doctor,” is not gently covering the eyes of the deceased man, but forcibly pressing down on his face and smothering him." 
 
Réalités (French magazine) 1946-1981 हे मासिक जीए जायच्या आधीच गेल होत. त्याच्या दोन अंकांची मुखपृष्ठे  सोबत. दोन्हीच्या थिम्स ह्या कलावंत आणि निर्मिती ह्या आहेत असे वाटते. 
 
 
Jean-Philippe Charbonnier, Réalités, April  1958


 Jean-Philippe Charbonnier, Réalités, Jan  1958