Friday, September 11, 2020

रेखाचित्रकार विनोबा...Vinoba Bhave@125

#ज्ञानोबा_ते_विनोबा  #VinobaBhave125  

 
आज सप्टेंबर ११ २०२०, विनोबा भावे यांची १२५वी  जयंती आहे. 

ह्या ब्लॉगवर कित्येक पोस्ट मध्ये विनोबा आहेत ,  

त्याची कारणे दोन आहेत - माझ्या वडलांनी सतत केलेले विनोबांचे, त्यांच्या साहित्याचे कौतुक आणि राम  शेवाळकर संपादित 'विनोबा सारस्वत' हे पुस्तक.

हे पुस्तक जसे  मला मिळाले तसा  मी विनोबांच्या साहित्याचा, त्यांच्या विद्ववत्तेचा आणि त्यांच्या मराठीचा फार मोठा फॅन झालो.

भारतीय संस्कृतीबद्दल मला सर्वात जास्त कोणी शिकवले असेल तर माझ्या आईने आणि विनोबांनी. 



आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विनोबांनी अत्यंत क्लिष्ट विषयवार केलेली रेखाटने.

त्यातील काही आपल्याला त्यांच्या 'विष्णुसहस्रनाम : (चिंतन- विवारणासह)', (माझ्याकडची आवृत्ती २००५) या पुस्तकात मुखपृष्ठापासून पुढे बघायला मिळतात.

जशी सदानंद रेगे आणि चिं वि जोशी यांची कार्टून्स पाहून सुखद धक्का बसला तसेच विनोबांची चित्रे बघून वाटले.

पण आश्चर्य वाटले नाही. गणितात रुची आणि प्रावीण्य असणाऱ्या माणसाला काही ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी समजावण्यासाठी चित्रात घाल्याव्याशा वाटणे साहजिक आहे.

त्या चित्रांपैकी दोन 'सोपी' चित्रे सोबत देत आहे.