नीरज (गोपालदास सक्सेना), मेरा नाम जोकर, 1970:
"...दुनिया ये सर्कस है
और सर्कस में
बड़े को भी, छोटे को भी, खरे को भी
खोटे को भी, दुबले भी, मोटे को भी
नीचे से ऊपर को, ऊपर से नीचे को
आना-जाना पड़ता है..."
"...दुनिया ये सर्कस है
और सर्कस में
बड़े को भी, छोटे को भी, खरे को भी
खोटे को भी, दुबले भी, मोटे को भी
नीचे से ऊपर को, ऊपर से नीचे को
आना-जाना पड़ता है..."
आमच्या मिरजेच्या घरात लाकडी जिना होता. खूप पायऱ्या नव्हत्या त्याला. दिवसात कित्येक वेळा मी त्याचा वापर करत असे.
आम्हा सगळ्यांना त्याची इतकी सवय होती की आवाजावरून समजत असे कोण जिन्यात आहे आणि कोणत्या पायरीवर आहे. (अनेकवेळा कोणी त्याचा वापर करत नसताना सुद्धा त्याचा आवाज येत असे!)
एखादे वाद्य ऐकल्यावर एखाद्याला वादक ओळखू येतो तसे जिना आम्ही वाचू शकत असू.
मिरज सुटून आता जवळजवळ ३५ वर्षे झाली. मात्र त्याचा आवाज शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहील.
ती माझी Ascending and Descending ची आयुष्यातील सुरवात!
एम सी इशर यांची चित्रे मी लहानपणा पासून अनेक पुस्तकातून, अनेक ठिकाणी पहात आलो आहे. त्यांनी एक प्रकारचे मायाजाल माझ्यासाठी तयार केले आहे.
ह्या चित्राचे नाव आहे 'Ascending and Descending' आणि ते तयार झाले १९६० मध्ये- माझ्या जन्म वर्षात. जणू मला ही त्यांच्या कडून भेटच मिळाली.
Steven Poole, The Guardian, June 2015:
"...The mathematical trickery in Ascending and Descending’s
staircase is not the subject of the image. Escher was never a
surrealist. But in this picture, it becomes clear that he was a kind of
existentialist. He had long admired Dostoyevsky and Camus, and in a
letter to a friend while he was working on Ascending and Descending
he explained: “That staircase is a rather sad, pessimistic subject, as
well as being very profound and absurd. With similar questions on his
lips, our own Albert Camus
has just smashed into a tree in his friend’s car and killed himself. An
absurd death, which had rather an effect on me. Yes, yes, we climb up
and up, we imagine we are ascending; every step is about 10 inches high,
terribly tiring – and where does it all get us? Nowhere.”..."
Wikipedia: "Escher suggests that not only the labours, but the very lives of these
monk-like people are carried out in an inescapable, coercive and bizarre
environment.".....अरे, हा तर जीएंचा स्वामीमधील मठच!