Wednesday, December 11, 2019

जी ए कुलकर्णींचा ३२वा स्मृतिदिन ....Date With Destiny

#जीएकुलकर्णीं३२वास्मृतिदिन 

आज डिसेंबर ११ २०१९, जी ए कुलकर्णींचा ३२वा स्मृतिदिन

जी ए कुलकर्णी, 'घऱ', पृष्ठ २१८, 'पिंगळावेळ', १९७७:
"...  तिला एकदा तिचे घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केंव्हा का बंद पडेना ते ! मग शेजारी सिगरेटचे एक पूर्ण पाकीट असावे. एखादा दरबारी छबिना  चौघडे-तुताऱ्या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेंपरेकोर्डवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात निःसंकोच सरदारी दिमागाने चित्रे आणि लेख छापणारे 'National Geographic' किंवा 'Realities'- सारखे एखादे मासिक हातात असावे . मग बोलावणे येऊन घेणाऱ्या , तू कसाही ये. तू दार ठोठावून ये. अगर आडदांडासारखा आत शीर.  असल्या एका सिगरेट मधून आलास तरी चालेल- नव्हे तू तसाच ये ! ते मलादेखील फार आवडेल ! ..."

(टीप: Réalités (French magazine) 1946-1981...  म्हणजे हे मासिक जीए जायच्या आधीच गेल होत!)
Artist: Jason Adam Katzenstein, The New Yorker, July 2018