"... भारतीय संस्कृतीतील वैविध्य व वैपुल्य या लेखकांनीं जसं नजरेआड केलं , त्याचप्रमाणे इंग्रजी संस्कृतीतील बंडखोर प्रवाहदेखील त्यांनी दुर्लक्षिला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला इंग्रजीमध्ये रोमँटिक कवी शेली (Shelley) याच्या सांस्कृतिक बंडखोरीच उदाहरण डोळ्यांपुढे होत, डीक्विन्सी (DeQuincey) या कलंदर लेखकाचं 'एक अफूबाज माणसाचं आत्मकथन' ही कृती होती. काव्यप्रांतात कोलरिजचं दीर्घकाव्य 'द राइम ऑफ द एन्शंट मँऱिनर' या मध्ये कुणाही प्रयोगशील लेखकाला अद्भुताचा प्रगल्भ, गंभीर, आदिबंधात्म वापर कसा करावा याचा वस्तुपाठ मिळाला असता. परंतु संस्कृतिसंकर या प्रकारे धाडसी, प्रयोगशीललेखनासाठी वापरावा, अशी प्रेरणा या काळातील मराठी वाङ्मयात दिसून येत नाही..."
('सशक्त संस्कृती, सीमित वास्तव १८८०- १९४५', वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव, २०११)
कृतज्ञता : वाङ्मय शोभा, जानेवारी १९४३
Artist: Corydon Bell (1894-1980), 1932
#ThomasDeQuincey