Friday, October 18, 2019

विंदांचे राहून गेलेले बर्गसॉंदर्शन - नारी दर्शन ....Bergson, Women and Vinda

#HenriBergson160

दुर्गा भागवत:
"... ' जे प्रमाणाच्या मापात, नसे बाबा सापडत; 
त्यात आणि आकाशपुष्पात , भेद काय?,'

हा तुम्ही अज्ञानवाद्यांना विचारलेला प्रश्न तुमच्याच अंगावर उलटवता येईल. अज्ञानाला एक न्याय आणि ब्रह्माला दुसरा , असे कसे? पण शेवटी असल्या डावपेचांनी अर्थ तो किती! म्हणून मी तक्रार करत नाही , ही अस्पष्टता व संदिग्धता निखळ तत्वज्ञानाला अपायकारक असली तरी तत्वकाव्याला उपकारकच ठरली आहे..."

 (पृष्ठ १६०, 'अमृतानुभवाच्या अनुवादाच्या निमित्ताने', 'भावसंचित', मे २०१५... 'संत ज्ञानेश्वरांचा ।।अमृतानभव।।: ज्ञानदेवरचित अनुभवामृताचे विंदाकृत अर्वाचीनीकरण', १९८१/२००८)

विंदा करंदीकरांच्या "अष्टदर्शने" मधील सातवे दर्शन आहे बर्गसॉंदर्शन (पृष्ठ ६५-७३), आवृत्ती २००३.

त्यात दोन महत्वाच्या उणीवा मला जाणवत आल्या आहेत...खालील गोष्टींचा उल्लेख विंदा करत नाहीत:

१. बर्गसॉं यांची २०व्या शतकाच्या सुरवातीची सेलेब्रिटी लोकप्रियता 
२. विशेषतः स्त्रियांमधील त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आलेली लाट

त्याची पुन्हा एकदा जाणीव मे २०१९ मध्ये एमिली हेरिंग यांचा हा लेख वाचून झाली.

"Women loved Bergson’s philosophy of creativity, change and freedom, but their enthusiasm fuelled a backlash against him... 

...The presence of women in a traditionally exclusively masculine space was regarded at best as a source of ridicule, at worst as a nuisance (for instance, some worried that, by their mere presence, the Bergsoniennes were robbing male philosophy students of their rightfully earned seats). Others took this phenomenon to be the sign of something more serious. The fact that so many women were drawn to Bergson’s philosophy perhaps said something about Bergson as a thinker. Indeed, traits traditionally associated with femininity, such as irrationality and sentimentality, clashed with the traditionally masculine qualities deemed necessary to be a good philosopher. Some of Bergson’s most serious adversaries began arguing that Bergson’s success among women was no accident. They believed that the reason the most irrational beings of all, women, were so enthusiastic about Bergson’s ideas was that Bergson’s philosophy was a philosophy of the irrational....

....Bergson’s philosophy, they said, lacked clarity, and should be combatted, because it was grounded in an unreliable and obscure mysticism that was ‘feminine’ in nature...."

विंदा म्हणतात :
".... 
बुद्ध आणि ख्रिस्त । बुद्धीला टाळून 
सन्मार्ग नवीन । दाखविती . 
मानवाविषयी । प्रेम व करुणा 
यांचीच प्रेरणा । होती त्यांना 
..."
 हे खरे आहे , पण बुद्ध आणि ख्रिस्त यांच्या बरोबरीने प्रेम व करुणा यांच्या संबंधात विंदांना स्त्री आठवत नाही?  प्रेम व करुणा म्हटल्यावर पहिल्यांदा मला माझी आई आठवते... आणि नंतर बुद्धी लावल्यावर आठवतात बुद्ध आणि ख्रिस्त!

Bergson and Einstein