Wednesday, July 10, 2019

वाढदिवस जी. एं. चा!...GA@96

#जीएकुलकर्णी९६

Saul Bellow:
"Realism has always both accepted and rejected the circumstances of ordinary life. It accepted the task of writing about ordinary life and tried to meet it in some extraordinary fashion. As Flaubert did. The subject might be common, low, degrading; all this was to be redeemed by art."

Holly Brubach:

“Bogart’s appeal was and remains completely adult — so adult that it’s hard to believe he was ever young. If men who take responsibility are hard to come by in films these days, it’s because they’re hard to come by, period, in an era when being a kid for life is the ultimate achievement, and “adult” as it pertains to film is just a euphemism for pornography.

JOHN STAUFFER:
"What is more courageous, militancy or a middle-class life? Fleeing for freedom or remaining loyal to a family?"

जीएंच्या साहित्यापेक्षा मला त्यांची जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रियजनांसाठी केलेला स्वार्थत्याग....तो ज्यावेळी मी वाचला त्यावेळी ते माझ्या साठी वरील अवतरणाप्रमाणे हम्प्री बोगार्ट झाले.... मला त्यांच्या लेखनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली... त्यांच्या लेखनाला आणखी जास्त खोली प्राप्त झाली...

सोबतचा उतारा सौ नंदा दैठणकर , जीएंच्या धाकट्या मावस बहिणींच्या लेखातून कृतज्ञता पूर्वक घेतला आहे.... (मूळ प्रसिद्धी : दै. सकाळ, जुलै ९ १९९२ , आता समाविष्ट 'प्रिय जी. एं.: स. न. वि. वि.', १९९४, परचुरे प्रकाशन मंदिर  मध्ये)

जीएं च्या संबंधातील अनेक भव्य दिव्य गोष्टी आजवर ह्या ब्लॉग वर आणि मी तयार केलेल्या फेसबुक पेज वर आल्या... आता पहिल्यांदाच त्यांचे खाद्यजीवन देतोय...

यातील बऱ्याच गोष्टी माझ्या सुद्धा प्रचंड आवडीच्या आहेत (डाळीचे वडे, बासुंदी) पण तुरीच्या डाळीची खिचडी आणि लहान कांदे घालून केलेला झुणका मी क्वचितच खाल्ला आहे...  पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप काही आवडत नाही....  मी आयुष्यात सिगरेट प्यालो नाहीये (ही अभिमानाची गोष्ट नाही) पण सिगरेट पिताना दुसऱ्यांना बघायला खूप आवडायच... passive smoking खूप केलय... Goldflake च्या रिकामा पाकिटाचा वास खूप आवडायचा... अजून नाकात आहे... मी पानाचा सुद्धा शौकीन नाही.... "आता पान खाव" अस कधीच वाटत नाही...

कन्नडा आणि मराठी असे दोन्ही बोलणारे कुलकर्णी आणि आमच्यासारखे फक्त मराठी बोलणारे कुलकर्णी (शिवाय माझी आई कोकणस्थ) यांच्यात भौगोलिक अंतर जास्त नसले  (या केस मध्ये बेळगाव - मिरज) तरी त्यांची खाद्य संस्कृती पुष्कळ वेगळी आहे.