#सदानंदरेगे९६
आज सदानंद रेगे यांची ९६वी जयंती आहे.
निरोप
"तुम्ही गेल्यापासून
तुमच्या कवितांची वही
अत्यवस्थ आहे.
असा एक शब्द जात नाही
जो तुमच्या नावे
बोटे मोडीत नाही.
तुम्ही मागे ठेवलेल्या प्रतिमाही
आता संपत आल्या आहेत.
पुड्या बांधायला
कवितांचे कागद घेण्याची
बांधिलकीही
वाण्यांनं पार झटकून टाकल्येय.
तेव्हा असाल नसाल
तिथंच असा
कविमुखावर दाढी ओढून.
तुमची वही
रोज थोडीथोडी
कोरी होत चाललेय;
तिला चांगला भाव यायला
अजून थोडा अवकाश लागेल.
तोवर
तुमची करावी लागतील
तेवढी तेरावी
आम्ही प्रत्यही
करूच करू. "
('ब्रांकुशीचा पक्षी')
ही कविता वाचून ज्या ज्या वेळी एक उत्तम कविता वाचल्याचे मला वाटते तेच वाटते :
अंतर्मुख करणारी, विनोद निर्माण करणारी आणि अंतिम कठोर सत्याजवळ जायचा प्रयत्न करणारी ... माझ्या दृष्टीने त्यातला विनोद सगळ्यात महत्वाचा भाग....
मी रेगेंच्या कुठल्याच कवितेचा शब्द्च्छल करत नाही तर एखाद्या चांगल्या कार्टून कडे बघितल्यासारखे तिच्या कडे पाहतो आणि तिच्या अर्थांच्या पदरांनी अचंबित होतो. (बा सी मर्ढेकरांची कविता तशी 'पहात' नाही तर शब्द न शब्द वाचत अनुभवतो.)
"तुमची वही/ रोज थोडीथोडी / कोरी होत चाललेय". ही कल्पना पहा....कोणी मूर्ख वही भरवेल, रेगे ती कोरी करतात...
किंवा हे : "तुम्ही मागे ठेवलेल्या प्रतिमाही/ आता संपत आल्या आहेत."... तुम्हीतर संपलाच आणि तुमच्या प्रतिमा सुद्धा संपत आल्या ... किती कठोर पण कसे उत्क्रांतीत बसणारे... मानव जातच कदाचित विनाशाकडे निघाली असताना तिला दिलेली वॉर्निंग... तुमच्या खुणा काय उरणार आहेत तर प्लास्टिकच्या बॅगा आणि चिकनची हाडे!
कलाकार :Constantin Brâncuși

अंतराळातील (ब्रांकुशीचा) पक्षी
कलाकार :Constantin Brâncuși