Saturday, June 08, 2019

Don't Sign Up For The Thought Police...Nineteen Eighty-Four@70

George Orwell's Nineteen Eighty-four was published 70 years ago on June 8 1949

भारतातील आणीबाणी (25 जून 1975 ते 21 मार्च 1977) चा काळ म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांच्या Nineteen Eighty-Four ची आठवण करून देणारा काळ होता.

मी मिरजेत होतो आणि महाराष्ट्रातील पहिली १०वी ची परिक्षा (मिरज शहरात) पहिल्या क्रमांकाने नुकताच पास होत होतो. मी किंवा माझे कोणतेही कुटुंबीय संघात जात नव्हते. माझ्या आईवडिलांनी कायम काँग्रेस ला तो पर्यंत मते दिली होती.

मी माझ्या डोळ्याने किसान चौकात झालेली तरुण मुलांची झालेली धरपकड, समाजात निर्माण झालेली घबराट आणि एका प्रकारची दहशत पहिली आहे. जी मी नंतर माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात फक्त ULFA उग्रवाद्यांमुळे आम्ही आसाम मध्ये सन १९८९-१९९२ काळात असताना निर्माण झालेली पहिली. 


आणीबाणी मुळे एक प्रकारची अशुभ सुरवात माझ्या कॉलेज जीवनाची झाली असे मी समजत आलो आहे. १९७५-७७ काळात सांगली रेडिओ वर "हम होंगे कामयाब" हे गाणे नेहमी ऐकू येई आणि ते तर गरुड पुराणासारखे वाटे.

मराठीतील अत्यंत कमी कलावंत त्या आणीबाणीच्या विरोधात उभे होते, त्यातील अग्रेसर होत्या दुर्गाबाई....

कुठलीही पुरस्कार वापसी स्कीम चालू नव्हती, किंबहुना एकावर एक फ्री पुरस्कार किंवा पद्मश्री वगैरे मिळतायत का ते चाचपण सुरु होत....

Nineteen Eighty-Four ला आज जून ८ २०१९ला ७० वर्षे पूर्ण होतायत...  



Artist: Unknown to me

Artist: The late  Charles Barsotti,  The New Yorker, 2013