या पोस्ट मधील इमेज मोठी करून जरूर वाचा.
१> त्यामधील डावीकडची मनमोहन यांची कविता तुफान लोकप्रिय झाली होती.
२> सप्टेंबर १९४८मध्ये ही कविता असलेल्या वाङ्मयशोभाच्या १०,००० प्रती काढण्यात आल्या होत्या!(भारताची लोकसंख्या १९४७ साली ३३ कोटी होती, आज २०१९ साली १३४ कोटी. म्हणजे आज ४१,००० प्रती काढल्या सारखे आहे. त्याशिवाय त्यावेळी प्रौढ साक्षरता खूप कमी होती. आणि circulation libraries खूप होत्या त्यामुळे एक अंक अनेक लोकांपर्यंत पोचायचा. थोडक्यात, हा सप्टेंबर १९४८ चा अंक फार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचला असेल. )
३> ही कविता संस्कृती रक्षकांना अश्लील वाटली होती!
ही कविता जर अश्लील असेल तर मर्ढेकर कसे पचणार होते या रक्षकांना? अशा प्रकारच्या रक्षकांमुळे २०व्या शतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कवीचे जीवन कमी झाले.
(एका प्रश्न मनात येतो - साहित्यावर सेन्सॉर बोर्ड सुद्धा एके दिवशी येईल असे उपरोधाने लिहून झाल्यावर पुढे मर्ढेकरांवर अश्लीलतेचा खटला झाला तेंव्हा वाङ्मय शोभेने मर्ढेकरांची बाजू लावून धरली होती का? का र धों कर्व्यांसारखे ते मर्ढेकरांच्या अनाकलनीय अशा विरोधात होते?)
वाङ्मय शोभा, मार्च १९५०
कलाकार: रघुवीर मुळगावकर , वाङ्मय शोभा, नोव्हेंबर १९४८