Saturday, April 06, 2019

महान साहित्य आणि बालपण हातात हात घालून असतात....Orson Welles and G. A. Kulkarni

ऑर्सन वेल्स आणि जी. ए. कुलकर्णी पूर्वी सुद्धा या ब्लॉग वर एकत्र आले आहेत, उदा.  एप्रिल ८ २०१८ रोजी इथे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये मी हे पहिले: Christophe Honoré’s यांच्या दहा आवडत्या सिनेमात वेल्स यांच्या 'The Magnificent Ambersons', १९४२चा समावेश आहे. तो सिनेमा माझा सुद्धा अत्यंत आवडता सिनेमा आहे- ती मला कविताच वाटते.

Honoré म्हणतात : "The Magnificent Ambersons is the most important of films for a director. It’s because of Welles, because he repeats to us, again and again, that cinema and childhood go hand in hand. And that theater is the birth of cinema."

हे वाचून मला जी. एंची 'कैरी' ('सुगंध', १९७३ समाविष्ट 'पिंगळावेळ', १९७७) आठवली: "पुन्हा पुन्हा जीए आपल्याला सांगतात की महान साहित्य आणि बालपण हातात हात घालून असतात"

आणि काय योगायोग आहे पहा The Magnificent Ambersons हा जी.एंच्या वाढदिवसाला १९४२साली प्रदर्शित झाला होता!


खाली डावीकडे अँन बॅक्सटर पहा.... ह्या दर्जाचे उत्कृष्ट अभिनय आणि सौन्दर्य यांचे मिश्रण कमी बघायला मिळते...