दुर्गाबाई भागवत आपल्या '
निसर्गोत्सव', १९९६ सालच्या पुस्तकातील “
पिवळीच मी पाकोळी की” या लेखात लिहतात:
"...क्रौंचवध पाहून ज्याचा शोक श्लोकत्व पावला, त्या वाल्मिकीला फुलपाखरू
दिसले नाही, मग इतरांना तरी कसे दिसावे?...आणि व्यासाचे उच्छिष्ट खाणारे
आम्ही? व्यासाची प्रज्ञा तर घालवून बसलोच, पण आमची प्रतिभाही आटली… मानवी
अंतरंग असो किंवा बाह्य सृष्टी असो, प्रकृतीचे आकलन, व तेही सूक्ष्म
असल्याशिवाय, कल्पना उंचावत नाहीत, भावना संयत होत नाहीत. विभूषित होत
नाहीत. आणि म्हणूनच फुलपाखरांचा अभाव
हा भारतीय साहित्याच्या अनेक अभांवाचा प्रातिनिधिक अभाव आहे असे मला वाटते… "
हे मी अलीकडे ट्वीटर (
https://twitter.com/spectatorindex) वर पहिले:
Decline in global population, past decade.
Butterflies: 53%
Beetles: 49%
Bees: 46%
Dragonflies: 37%
Flies: 25%
दुर्गाबाईंना हा दिवस आपल्या मृत्यू नंतर (साल २००२) इतका जवळ आहे असं कधी वाटल असेल?
"पिवळीच मी पाकोळी की
....
दूर्गेनंतर निम्मी नाश पावले मी
भारतीय साहित्यातूनच केंव्हाच नव्हते विशेष
आतातर जगातूनच नष्ट होत निघाले मी..."
Artist: Emily Flake , The New Yorker, August 2019