Saturday, November 17, 2018

जेंव्हा वाहन चालवायचा स्कार्फ चुंबनात ओढला जातो/ रसिक किती हा स्कार्फ.....René Magritte's The Lovers@90

#RenéMagritteTheLovers90 
#स्कार्फस्त्रीआणिटूव्हिलर
अण्णासाहेब किर्लोस्कर, 'संगीत सौभद्र', १८८२
"अरसिक किती हा शेला । त्या सुंदर तनुला सोडूनि आला ॥ 

प्रेमें प्राणपतीला । मी संतोषें हा अर्पण केला ।
 दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला । 
तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला । 
कोंडुन ठेविन याला । मज दृष्टीस नलगे निष्ठुर मेला ।"

रिने मॅग्रिट (René Magritte) यांच्या खालील जगप्रसिद्ध पेंटिंग साठी कॅप्शन कॉन्टेस्ट दी न्यू यॉर्कर ने २०१४साली घेतली होती.


'The Lovers', 1928

"रसिक किती हा स्कार्फ"

जज्ज बॉब मॅन्कोफ्फ (Bob Mankoff) यांना आवडलेल्या काही एन्ट्रीज पहा:

“Love in a Time of Influenza.”

“Darling, couldn’t we go back to just turning off the lights?”  

“I’m seeing someone else.”

“If muslin be the food of love, chew on.”

माझ्या डोक्यात मात्र हे चित्र पाहिल्यावर फ्लू वगैरे काही आल नाही,  फक्त एकच आले... टू व्हिलर चालवणारी मुलगी तिच्या प्रियकराला भेटायला आलीय, त्याला पाहून डोक्यावरचा स्कार्फ काढून टाकायचे भान सुद्धा तिला  उरले नाहीय  आणि इतक्या उत्कट भावनेने ते चुंबन घेत आहेत की तिचा स्कार्फ तिच्या लव्हरच्या आणि तिच्या डोक्या भोवती गुंडाळला गेलाय...

 तेंव्हा माझे कॅप्शन आहे : "जेंव्हा वाहन चालवायचा स्कार्फ चुंबनात ओढला जातो....." किंवा "रसिक किती हा स्कार्फ."... 

कोणत्याही कलेचे रसग्रहण शेवटी आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या कोंदणात करत असतो... हे पेंटींग मी पहिल्यांदा याच शतकात, पुण्यात राहिल्या आल्यावर पाहिलय... आणि ती स्त्री टू व्हिलर चालवत तिच्या प्रियकराला भेटायला इथे आली आहे ह्या शिवाय माझ्या डोक्यात काहीही येत नाहीये...  स्कार्फ, स्त्री आणि  टू व्हिलर हे समीकरण इतके घट्ट झाले आहे....

१९२८ साली , ज्या वर्षी हे चित्र प्रदर्शित झाले, पुण्यात एकही स्त्री टू व्हिलर चालवत नव्हती किंबहुना "India had its first set of scooters in 1948, when Bajaj Auto imported the Vespa scooters."

कला आणि मोठे कलावंत हे नेहमी प्रत्येक पिढीने नव्याने interpret केले पाहिजेत... महाकाव्ये, संतकवी पासून मर्ढेकर, जीए, वसंत सरवटे,  सदानंद रेगे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर वगैरे.... किंबहुना ते नव्याने interpret होत असतील तरच ते महान आहेत!