Saturday, October 20, 2018

अपुरा, नित्य नवा राहिलेला मोरगावचा नंदी ....D G Godse and Morgaon's Nandi

ऑक्टोबर २०१८मध्ये मोरगावच्या गणपतीला गेलो होतो. द ग गोडसेंचा 'अष्टविनायक', १९७५/१९८१ लेख वाचल्यापासून जायचे होते. मुख्यत्वे तिथला नंदी पाहायला...


पृष्ठ : १११-११२, 'समन्दे तलाश', १९८१

सौजन्य : गोडसे यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स

मंदिराच्या ऑफिस मध्ये बरीच पुस्तके मिळतात, त्यांना विचारले: नंदी वर पुस्तक आहे का?.... "नाही"... नंदीच्या ऐतिहासिकतेबद्दल एक ओळ कुठे लिहिली नाहीये... तिथे एक सूचना दिली : अष्टविनायक ही लोकप्रिय धार्मिक स्थळे तर आहेतच पण त्याच बरोबरीने ती ऐतिहासिक स्थळे सुद्धा आहेत.. तेंव्हा गाईड उपलब्ध असल्यास त्या अनुषंगाने लोकांना माहिती सांगता येईल.

मी बराच वेळ नंदीचे (श्री नंदीकेश्वर) निरीक्षण करण्यात घालवला.... वरील गोडसेंच्या लेखातील परिच्छेद नंदीवरील त्यांच्या लेखनाचा छोटा भाग आहे. मूळ पुस्तक जरूर वाचा.

दुर्दैवाने पुस्तकात नंदीचे चित्र वा फोटो नाही... जेमतेम ४ (सामान्य दर्जाचे) फोटो आहेत ... ते पुस्तक coffee table book स्वरूपात, चित्रांनी नटवून काढता आले असते.. माझ्या साठी ते तरीही एक सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे...

खालील दोन फोटो मुद्दामहून दोन वेगळ्या अँगल मधून दिले आहेत....