Sunday, December 24, 2017

तूपाची मावशी: हिंदुस्तान लिव्हर लिखित चविष्ट अनंतअंकी कौटुंबिक मराठी नाटक.... Andy Warhol Would Have Created Dalda Art


#वसंतसरवटेपाहिलेपुण्यस्मरण 
#VasantSarwateOneYearLater
 
Today December 24 2017 is the first death anniversary of Vasant Sarwate (वसंत सरवटे)...लोक तुमची फार आठवण काढताना मी वाचत नाही पण काळ जाईल, लोक जागे होतील आणि म्हणतील असा कलावंत महाराष्ट्रात होऊन गेला: "भारतातील आजवरचा सर्वोत्तम व्यंगचित्रकार"... 

डालडा - माझ्या लहानपणचा एक अविभाज्य भाग ...लहानपणच का? अगदी मोठ होईपर्यंत सुद्धा म्हणता येईल ...पण आता मध्यमवर्गीय घरातून बदनाम झालेला.... तुपाला पर्याय म्हणून तर सोडा पण जणू विषच!....

डालडा त्यावेळी नुसता स्वैपाघरातच नाही तर सारखा जाहिरातीत दिसायचा, व्यंगचित्रात दिसायचा, लेखनात दिसायचा, दिवाळी अंकात दिसायच, डालडाचे डबे सगळीकडे दिसायचे, डालडाला तूप म्हटल जायच, आमच्या घरात त्याचा बराच वापर व्हायचा, डालडात तळलेले पदार्थ मला प्रचंड आवडायचे...डालडा त्यावेळी स्मार्ट होता!



 पृष्ठ : ७७, 'व्यंगकला-चित्रकला', वसंत सरवटे, २००५

सौजन्य : सरवटेंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स

मराठीतील एका प्रचंड बेस्टसेलरच्या-  पु ल देशपांडे लिखित 'बटाट्याची चाळ'- पहिल्या आवृत्तीच्या , १९५८ मुखपृष्ठाच्या केंद्रस्थानी काय आहे पहा: डालडाचा डबा !


“... Sagar Boke, marketing head at Bunge India, the current owner of Dalda, explains, "The challenge for Dalda in the initial years was to drive home the point that it tasted just like desi ghee, had deep-frying properties like it, but unlike ghee, it wouldn't feel heavy either on the pocket or the palate."...

....Dalda rode over the initial controversies, such as the one in the 1950s, which called for a ban on Dalda, because it was a "falsehood" - a product that imitated desi ghee, but was not the real deal. In other words, critics argued that Dalda was an adulterated form of desi ghee, harmful for health.
The Prime Minister then, Jawaharlal Nehru, called for a nationwide opinion poll, which proved inconclusive. A committee was set up by the government to suggest ways to prevent adulteration of ghee. But nothing came of it..."”

 कस पटवून द्यायच लोकांना की डालडा तुपापेक्षा भारी, आरोग्याला हानीकारक नसून चांगल आहे? प्रतिष्ठेच्या मराठी दिवाळी अंकात डालडा कथा लिहून! (पुढे मग 'लिज्जत' कविता आल्या.)



वरील वाङ्मय शोभेच्या ऑक्टोबर १९५८च्या अंकातील पान वाचा... प्रथमदर्शनी ही एक कथा वाटते...पण ती आहे डालडाची जाहिरात....उजव्या कोपऱ्यात खाली लेखकाचे नाव आहे: हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, मुंबई!

आहे ना प्रॉडक्ट प्लेसमेंट चे जबरदस्त उदाहरण....खर म्हणजे हिंदुस्तान लिव्हर न एखाद नाटक सुद्धा त्याकाळात स्टेज करायला पाहिजे होत: "तूपाची मावशी"

 त्यामानाने भारतातील बहुतेक मोठ्या कलावंतांनी डालडाकडे दुर्लक्ष केलेल दिसतय... मला अँडी वॉरहॉल (Andy Warholl) यांच्या कॅम्बल सूपच्या आर्ट सारख म्हणायचय...



 courtesy: copyright owners

मला माहीत नाही की कै. सरवटेंनी वॉरहॉलच्या ह्या आर्टची थट्टा त्यांच्या 'मॉडर्न आर्ट : अर्थ ज्याचा त्याचा' ह्या सिरीज मध्ये केली आहे का नाही ते. आज ते असते तर त्यांनाच डायरेक्ट विचारले असते. त्या सिरीजमधले एक उदाहरण ह्याच ब्लॉगवर इथे पहा.