Friday, September 29, 2017

मराठी व्यंगचित्रातील एक मनोहर प्रयोग ...Chandrashekhar Patki and Padma Sahasrabuddhe

ज्यांनी 'आवाज' मधली एका पेक्षा एक धमाल चित्र काढली  ते,  'आवाज खिडकी'चे कर्ते, कै. चंद्रशेखर पत्की (c १९३३-२००८) आणि फार मोठ्या मुखपृष्ठकार पद्मा सहस्रबुद्धे यांनी मिळून खालील कव्हर तयार केले आहे ...रंगसंगती पद्मा सहस्रबुद्धे यांनी केली आहे, बाकीचे काम पत्कींनी....


सौजन्य : पत्की, सहस्रबुद्धे यांच्या कार्याचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, मार्च १९५९, बुकगंगा.कॉम


लाल आणि पिवळ्या रंगांच्या चौकटी.... मी असे चित्र आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय....  त्या स्त्रीकडे पहा , ती बाप काय करतोय ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे...आणि प्रेमी? त्याला या कशाचीच पर्वा नाहीये... त्याला तिच्यासाठी गाण वाजवायचय

मराठी व्यंगचित्रात या योग्यतेचे प्रयोग त्या नंतरच्या (जवळजवळ) ६०वर्षात फार कमी झाले असतील