श्री वि मा परब यांना में २०१७ मध्ये गूगल केले तर त्यांच्या, मराठी भाषिक लोकांच्या कराचीशी असलेल्या नात्याबद्दलच्या लेखनाचे रिसल्ट्स मिळतात.
पण मला त्यांचा मुंबईवरचा अप्रतिम लेख, वाङ्मय शोभाच्या फेब्रुवारी १९५६मध्ये प्रसिद्ध झालेला, पण बहुदा १९५३साली लिहला गेलेला, वाचायला मिळाला.
ऑक्टोबर १९४७ मध्ये परब मुंबईत कराचीहून शरणार्थी (त्यांच्या शब्दात निर्वासित) म्हणून आले. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांनी तो लेख लिहला असावा. कारण सहा वर्षाचा उल्लेख दोन तीन वेळा आला आहे.
१९४७ साली, जेंव्हा संयुक्त महाराष्ट्र घडायचे होते, प्रादेशिक पक्षांचा उदय व्हायचा होता, तेंव्हा मुंबईच्या भाषेची ही स्थिती होती, आणि ती १९५३पर्यंत तरी बदलली नसावी असे लेखावरून वाटते.
एक शरणार्थी असल्यामुळे परब यांच्याकडे भाषेकडे, संस्कृतीकडे बघण्याचा एक विशेष दृष्टिकोन होता. शिवाय ते 'आर्म चेअर' लेखक मला वाटत नाहीत. सगळी मुंबई ते पालथी घालायचे असे वाटते. म्हणून मला त्यांचे विचार मौलिक वाटतात. मी तरी आत्तापर्यंत अशाप्रकारची निरक्षण मुंबई बाबत वाचली नव्हती. ना गो कालेलकरांसारख्या भाषातज्ज्ञांच्या लेखनात सुद्धा मी अस काही वाचल नाहीय.
मुंबईच्या बदलत्या भाषेचा अभ्यास स्वातंत्र्यानंतर दरवर्षी करता आला असता. झाला आहे का? मला माहित नाही.
सध्या २०१७ साली मुंबईची जी भाषा आहे ती १९४७साली कराचीत होती.
Artist: Edward Frascino, The New Yorker, October 26 1981
त्यावेळी लोक म्हणत असतील: "काय बर याला म्हणतात मराठीत?"

मी ज्यावेळी १९८०च्या दशकात मुंबईत पहिल्यांदा आलो आणि नंतर राहिलो त्यावेळी मुंबईच्या भाषेची कराची केंव्हाच झाली होती! घराबाहेर पडल की दादर पासून कुलाब्यापर्यंत हिंदुस्थानीच आपोआप तोंडात यायच. त्यामुळे हे सगळ वाचून मजा वाटली.
माग एक लेख मराठीतील प्रथितयश लेखकाचा वाचला होता: मराठीला प्रेमाची भाषा करा म्हणजे ती हिंदीला टक्कर देईल...अस काहीस म्हणण होत.
मला नाही वाटत अस काही करता येत...शहर, भाषा एखाद्या जीवा सारखी कायम उत्क्रांत होत राहतात...अस केंव्हा झाल, शेपूट केंव्हा गेल या प्रश्नाच अचूक उत्तर देण अशक्य असत ...आणि उत्क्रांती थांबवता, टाळता येत नाही...आज हिंदुस्थानी मुंबई मध्ये प्रमुख व्यवहाराची भाषा झाली आहे.
रस्त्यात प्रचंड प्रमाणात मराठी स्त्री-पुरुष असतील पण भिकारी हिंदुस्थानीत भीक मागतो, लोकलचे/बसचे/सिनेमाचे तिकीट देणारा हिंदुस्थानीत बोलतो, टी. सी. हिंदुस्थानीच बोलतो, जिकडे जावे तिकडे हिंदुस्थानी. पारशी हिंदुस्थानी बोलतो, गुजराती हिंदुस्थानी बोलतो, मुसलमान हिंदुस्थानी बोलतो, सगळेच हिंदुस्थानी बोलतात... अखिल महाराष्ट्रातील हॉटेलात हिंदुस्थानीत ऑर्डर देतात, केस कापणारे हिंदुस्थानीत बोलतात, लोकल/बस मध्ये शेजारी उभा/बसलेला सहप्रवासी हिंदुस्थानीत बोलतो, टॅक्सी/रिक्षा वाले हिंदुस्थानीत बोलतात, (किमान) इंग्लिश शाळेतील मुले परस्परांशी हिंदुस्थानीत बोलतात, फेरीवाले हिंदुस्थानीत बोलतात, दुकानदार हिंदुस्थानीत बोलतात, ऑफिस मध्ये हिंदुस्थानी किंवा इंग्लिश मध्ये बोलतात....
(वरील मासिकातील उतारे सौजन्य: श्री वि मा परब , वाङ्मय शोभा)
त्यावेळी लोक म्हणत असतील: "काय बर याला म्हणतात मराठीत?"