(टीप : एअरलाईन मधील इंगळी = एअरलिंगळी)
सध्या विमान प्रवास खूप चर्चेत आहेत.
एका प्रवासाआधी प्रवाशाने एअरलाईन स्टाफला बेदम मारले, दुसऱ्या प्रवासाआधी एअरलाईन स्टाफने प्रवाशाला.
"a passenger was viciously dragged off of a flight, suffering
a concussion, broken bones and lost teeth"
ज्यावेळी 'United Airlines Passenger Stung by a Scorpion' अशी बातमी वाचली त्यावेळी आठवले संत एकनाथ आणि त्यांची रचना:
"...अग, ग.. विंचू
चावला
देवा रे देवा..
विंचू चावला
आता काय मी
करू.. विंचू चावला
काय मी करू विंचु चावला..."
एकनाथांच्या उरलेल्या ओळीतून सगळ्यांना बरच काही शिकण्यासारखे आहे.
"...या विंचवाला उतारा, तमोगुण
मागे सारा
तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा
फुगा फुगला असेल
तर,
पिन लावून थोडीशी हवा
कमी करा.
सत्त्वगुण लावा अंगारा,
अन् विंचू इंगळी
उतरे झरझरा...."