Sunday, April 23, 2017

मी बिस्वम्भर रॉय नाही पण... Satyajit Ray Died 25 Years Ago Today

आज एप्रिल २३ २०१७, सत्यजित रे यांचा २५वा स्मृतिदिन


Philip French:
"...Beside my working desk as I write is an autographed photograph of Ray and his friend Akira Kurosawa walking a couple of feet apart and deep in thought in front of the Taj Mahal. It was taken in the mid-70s during a trip to Agra from a film festival in New Delhi, on which I had the privilege to accompany them. It is a constant reminder to me of the heights to which cinema, the great new art of the 20th century, can aspire, and why writing serious criticism can be an honourable undertaking."

एप्रिल १९९२च्या शेवटी, रोजच किमान १२ तास लोड शेडींग असलेल (लोकांच्या घरी इनव्हर्टरच्या बरोबरीने छोटे डिझेल जनरेटर असत!),  कलकत्ता आम्ही सोडल. रे वारल्यानंतर मी अंजुला म्हणालो आता कलकत्ता सोडायच दुःख कमी होईल कारण इथ आता  रे नाहीत. त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी 'नंदन' मध्ये ठेवल होत. मी तेथुन दोन-तीन वेळा तरी चालत गेलो पण आत काही गेलो नाही.

त्यांच घर माझ्या ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर होत. बऱ्याचवेळा मी त्यांच्या घरावरून (बिशप लेफ्रॉय रोड , जे आता पर्यटक आकर्षण झालय म्हणे) चालत गेलो आहे,  विचार करत की अत्ता रे आत असतील का, काय करत असतील!

ते गेल्यावरच्या आठवड्यात अंजु न आणि मी त्यांचे जवळ जवळ सगळे सिनेमा दूरदर्शन वर पहिल्यांदा पहिले. त्यांच्या एवढ्या मोठया कलाकाराच जाण अपेक्षेप्रमाणे कडू-गोड ठरल ...सत्यजित रे कसले गेले? सिनेमा दाखवत बसले...

रें चे कितीतरी उल्लेख ह्या ब्लॉग वर आले आहेत. उदा इथे: "Is She J E Millais's "Mariana" or Ray's "Charulata"?"

 मला सगळ्यात जास्त आवडलेला रें चा सिनेमा, 'चारुलता'हून सुद्धा काकणभर जास्त: जलसाघर, १९५८ (Jalsaghar).

जशी मराठी मध्यमवर्गाला साधारण सन २०००  नंतर आर्थिक सूज येत गेली (प्रामुख्याने मोठ्या शहरातील एक्सपोनेनशियली वाढत गेलेल्या घराच्या किमती, आय.टी., ग्लोबलायझेशनचा चढता आलेख, तगडा डॉलर मुळे) तसा हा सिनेमा मला जास्त आवडत आलाय.

एखाद्या विषयाचा खोल अभ्यास/ वाचन  नसताना त्याबाबत हिरीरीने व्यक्त  होणारे, कुठल्याही गोष्टीकडे जरासुद्धा दीर्घ/ऐतिहासिक दृष्टिकोनातून  न पाहणारे, एकाच नजरेतून जगातील प्रत्येक गोष्ट घटना पाहणारे, ज्याअर्थी आपण (किंवा आपली मुले) आर्थिक किंवा इतर बाबतीत इतके यशस्वी आहोत म्हणजे आपल्याला वाटते ते वैश्विक सत्यच असणार असे समजणारे, बोलण्याचे विषय पैसा-दिसणे-जीम-फिटनेस- वार्षिकव्हेकेशन  इतकेच असलेले नवश्रीमंत माहीम गांगुली सर्व क्षेत्रात  वाढत गेले, आणि त्यातील  काही कधीकधी जवळचे नातेवाईक सुद्धा निघाले!

मी बिस्वम्भर रॉय नाही पण मला त्यांची वेदना समजते- त्यांच्या पत्नी आणि पुत्र शोकाइतकीच ती क्लेशकारक आहे, त्यांचे 'तुफानी' नाहीसे होणे समजते....

 बिस्वम्भर रॉय आणि तूफान : आनंदी दिवसां मध्ये  

पण मला रे सर्वात जास्त आवडतात त्यांच्या लिखाणातील अशा सचोटी मुळे : 
 "… The one thing I am very much interested in is a loner – one person. Quite often in my stories you will see just one person ; he hasn't married, he doesn't have any children, he lives with his own preoccupations … I have personally realised what loneliness is during most of my life. … And often I feel, if I were asked ‘Who is your friend?' I would not be able to name anyone … I am quite alone. Quite alone and I have become used to it. At no time have I regretted the fact that I am alone, or that I lack friends.…”

“The fact that the man doesn’t know what is happening really, doesn’t know the process of history, makes him a figure of pathos. He’s pathetic, like a dinosaur that doesn’t realise why it’s being wiped out.”


 स्वतः रेंनी डिसाईन केलेले जलसाघरचे पोस्टर ... इतके देखणे (उदा: फॉन्ट) आणि बोलके (उदा: दुभंग) पोस्टर मी पहिले नसेन