Monday, March 27, 2017

जागतिक रंगभूमी दिन आणि तंजावरचा मराठी राजा

आज मार्च २७ २०१७ला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त, मी सुरु केलेल्या काही फेसबुक स्मारकांवर, काल प्रसिद्ध केलेली पोस्ट... 

 साभार :  द ग गोडसे, 'नांगी असलेले फुलपाखरू', १९८९, पृष्ठ: ८१


वरील  माहिती २०१७ साली नवी नसेल,  पण ती कै द ग गोडसेंच्या प्रभावी सादरीकरणामुळ वाचायला मजा येते.... आणि ज्यावेळी आपण मराठी म्हणतो त्यावेळी आपण कधी कधी किती लघु दृष्टीने पाहतो हे विचार करण्याची गोष्ट आहे...

अटकेपर्यंत गेल्याचा अभिमान असू द्या पण आजच्या समृद्ध, रसरशीत आणि अनेक महापुरुष व स्त्रीयांनी मशागत केलेल्या अशा कर्नाटक संगीताचा महावृक्ष तंजावर दरबारामुळे फोफावला  ही माझ्यामते जास्त अभिमानाची गोष्ट आहे....अमेरिकेची खरी सत्ता तीच्या 'सॉफ्ट पॉवर' मधून येते, हायड्रोजन बॉम्ब मधून नाही, इराक वरच्या विजयातून नाही....

तंजावरचा विचार आपण कोल्हापुर आणि साताऱ्याच्या बरोबरीने किमान विसाव्या शतकात तरी करायला हवा होता...

[वर दिलेला छोटा परिच्छेद गोडसेंच्या 'शतायुषी सौभद्र' या एकमेवाद्वितीय मराठी लेखातून घेतला आहे.
मराठी (किमान मध्यमवर्गीय) संस्कृतीचे आभूषण ठरलेल्या संगीत सौभद्रची ही जन्मकथा आहे.
आपले सर्वस्व पणाला लावून गोडसेंनी या शिल्पाची रचना केली  आहे. त्यांच्यातील रसिक, नेपथ्यकार, वादक, सूक्ष्म वाचक, चित्रकार, लेखक, इतिहासाचा अभ्यासक, नाटकाचा प्रेक्षक, साहित्य टीकाकार....एका हार्मनी मध्ये वाजताना या लेखात ऐकू येतात.
हा बत्तीस पानी लेख जरूर वाचा. मात्र कृपया एक लक्षात असू द्या - मी तो लेख येथे देऊ शकणार नाही.]