दीपावली चा डिसेंबर १९५९- जानेवारी १९६० असा संयुक्त अंक निघाला होता , त्या मध्ये प्रजास्तकक दिनाचा उल्लेख सुद्धा नाही ...
आणि एका वर्षात जानेवारी १९६१ मध्ये झालेला हर्ष पहा ...
काय कारण असावे ?
मला वाटते काही गोष्टी आपल्याला आज जशा वाटतात तशाच आपल्या आधीच्या लोकांना वाटत असतील असे नसते.
माझ्या लहानपणी बैलपोळा किती मोठा सण मिरजेत होता , आज तो तसा राहिला नाहीये ... महाराष्ट्रात वसंत पंचमी १८-१९व्या शतकात मोठी साजरी केली जायची , आज ती केंव्हा आहे हे सांगावे लागते... अशी अनेक उदाहरणे देता येतील ...
मी १९४७ साली लहान-मोठ्या असलेल्या अनेक लोकांशी आजवर बोललो आहे , त्यांना १५ ऑगस्ट इतका काही आठवत नव्हता, माझे आई-वडील (त्यावेळी वये ९, ११) तर त्याचा उल्लेख सुद्धा करीत नसत .. उत्साह होता , ऊर्जा होती, मनात आनंद होता पण दिवस एखाद्या सणाच्या दिवसासारखा , आणि हे महाराष्ट्रात, उत्तरेत तर खूप काही दुःखद चालले होते...
वर्तमान कधीही भूत आणि भविष्यावर लादता काम नये.
दीपावली जानेवारी १९६१ चे मुखपृष्ठ सोबत
कलाकार : दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओ
सौजन्य आणि आभार :
