Tuesday, October 21, 2025

तिसरी चपाती खाण्याचे आपण का टाळू नये ! ...Saving Forex By Not Eating Third Chapati

W. H. Auden, 'Good-Bye To The Mezzogiorno', 1958:
 
"...though one cannot always

Remember exactly why one has been happy,
There is no forgetting that one was."

नुकतेच संपलेले, १९६५ साल हे, १९६२ साला नंतरच्या लगेचच झालेल्या युद्धामुळे, अतिशय खडतर होते ... 

सोबत 'दीपावली' च्या जानेवारी १९६६ च्या अंकातील सरकारी जाहिरात पहा, जी सांगत आहे शक्यतो तिसरी चपाती खाऊ नका! .. आणि ते सांगायला किती  कोलांट्या उड्या पहा "तिसरी चपाती खाण्याचे आपण का टाळू नये ! "!
 
ही भारताची, आमच्या बालपणाची अवस्था होती.... 
 
१९६० दशक: युद्धे, अन्नधान्य टंचाई
 
१९७० दशक: युद्ध, प्रचंड दुष्काळ , अन्नधान्य टंचाई , पेट्रोल चा भडका ,जीवघेणी महागाई , बेकारी 
 
ह्या दोन दशकात आम्हा  कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची पूर्ण वाट लागली  , लक्षात ठेवा जाहिरात दीपावली सारख्या किंचित महाग अंकात आहे ... १९८० दशकाच्या सुरवातीला आम्हाला जेमतेम पैसे पुरत होते ... कित्येक नातेवाईक आणि मित्रांची कुटुंबे आणखी वाईट अवस्थेत होती...
 
१९८० दशक: अनेक राज्यातील आतंकवाद, औधोगिक अशांतता, बेकारी .... 
 
अशी माझ्या आयुष्यातील तीन  दशके गेली ...