आज माझ्या आईचा ८७वा वाढदिवस
त्या निमित्ताने, मूळ मार्च १४ २०१९ रोजी फेसबुक लिहलेली पोस्ट , इथे आणतोय...
हाटकेश्वर देऊळ, सोमवार पेठ , कराड
मी १ वर्षाहून लहान असताना माझे आई-वडील आणि मी कराड ला एखादा वर्ष १९६१ साली राहातो होतो त्यावेळी आई मला या मंदिरात नेत असे तिच्या कडून अनेक वेळा ऐकले होते....
१९६१ नंतर मार्च २०१९ मध्ये जायचा योग आला..
१७५० साली मूळ बांधलेले मंदिर अजून सुरेख आहे. लहान मुलांना रांगायला/ खेळायला त्याच्या समोरील सभामंडप अजून मस्त आहे.
आम्ही तिथे असताना कोणीही नव्हते. हा एक बोनस. कृष्णा नदी हाकेच्या अंतरावर आहे. मंदिरातून घाटावर जाणे हे आमचे routine असायचे म्हणे.
ज्यावेळी १९६१ साली कोणत्यातरी दिवशी आईने मला शेवटचे त्या मंदिरात नेले असताना तिला (१९३७- २००६) वाटले असेल का कि आयुष्यात आता मी अनुच्या बरोबर इथे केंव्हाही येणार नाहीये. आता अनु येईल ते स्वत:च्या पायांनी पण त्यावेळी त्याच्या बरोबर मी नसेन.....
अंजु आणि मी तिथे बराच वेळ होतो. आई बहुदा ज्याठिकाणी बसली असेल तिथेच आम्ही बसलो असू.