Friday, July 19, 2024

Arthashastra, Book 16, Chapter 3, Mauryan Times, Ganapati...कौटिल्य अर्थशास्त्र, द ग गोडसे, अष्टविनायक

जुलै ५ २०२३ रोजी ट्विटर वर John Oldman @PrasunNagar यांच्या हॅन्डल वर खालील वाचले, कौटिल्य अर्थशास्त्रात मौर्य काळात पूजल्या जाणाऱ्या देव-देवतांची यादी... 

दुर्गाबाईंनी मराठीत अनुवाद झालेल्या एका कौटिल्य अर्थशास्त्राला दीर्घ प्रस्तावना लिहली आहे...

Arthashastra, Book 16, Chapter 3, mentions the following deities who were worshipped in Mauryan times:

1) Aparajita (Durga),
2) Aparatihata ( Vishnu) ,
3) Jayanta,  
4) Kumara (Skanda),
5) Vaijanta (Indra),
6) Shiva,
7) Vaisravana ( Kuber),
8) Asvins,
9) Sri ( Laxmi)

माझ्या लगेच लक्षात आले की ह्यात गणपती नाही , आणि त्याच बरोबर दुर्गाबाईंचे एक सह अभ्यासक आणि सहलेखक द ग गोडसे यांचा 'दिवाळी १९७५ मध्ये लिहलेला 'अष्टविनायक' हा लेख आठवला...

तो लेख आता गोडसे यांच्या 'समन्दे तलाश', १९८१ ह्या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यातील पृष्ठ ११९ वरील काही भाग मी सोबतच्या चित्रात जोडला आहे.

गणपती नाही कारण "पुराणोक्त उपासनेचे गणपती हे दैवत अर्वाचीन असून त्याची पुराणोक्त उपासनाही तेवढीच अर्वाचीन ठरते."... 

 

सौजन्य: गोडसे यांच्या साहित्याचे कॉपी राईट होल्डर्स