Tuesday, April 09, 2024

Akash Mallige and Bakul...बुचाची आणि बकुळीची फुले

 A few years ago, before COVID epidemic, when I used to walk on the road outside our housing society, during monsoon, walking in the morning became interesting because it gave me an opportunity to go past Millingtonia hortensis, tree jasmine or Indian cork tree (आकाशनिंब, बुचाचे झाड) in a nearby society and pick up just one or two flowers from hundreds that would be lying on the ground and smell them all the way to the home.

Now of course walking on roads in our area, even in the morning is hazardous...

My wife's cousin Rohan sends me a picture on WA occasionally when there is a shower of  Latak chandani/ Akash Mallige / बुचाची फुले on the road adjacent to his house. 

Looking at that picture, I could smell Akash Mallige (what a beautiful word in Kannada for it, contrast that with a horror of a Marathi word for it).


दुर्गा भागवत:
"... शिवाय बकुळी, सुरंगीप्रमाणे सुकले तरी त्याचा सुवास कायमच असतो. डोक्यात घातले तर दिवस दिवस केसांना त्याचा वास लागलेला असतो..."  आणि बकुळीची फुले
 
(पृष्ठ २३, ऋतुचक्र, 'चैत्रसखा वैशाख', १९५६/२००२)
 
पु ल देशपांडे यांनी त्यांच्या 'रवींद्रनाथ : तीन व्याख्याने' या पुस्तकात रवींद्रनाथ यांना उद्धृत केले आहे : 
 
'बकुलगन्धे बन्या एलो दखिन हावाय स्त्रोते' (As southerly started blowing, fragrance of Bakul flooded the woods)
 
सध्या माझी धाकटी बहीण सांगली जिल्ह्यात मे २०२३ मध्ये गेली होती.  तिथे तिच्या विश्रामबागच्या एका मैत्रिणीच्या सोसायटी जवळील बकुळीच्या फुलांचा फोटो काढून तो तिने माझ्या भावाला आणि मला लगेच पाठवला, इतके बकुळीचे आणि आमचे जवळचे नाते आहे. 
 
मिरजेला आम्ही राहत असताना (१९६१-१९८५) आमच्या घरापासून ५० मीटर अंतरावर बकुळीचे मोठे झाड होते आणि आम्ही तिन्ही भावंडे आयुष्यातील काही वर्षेतरी त्याची रस्त्यावर पडलेली (केंव्हा केंव्हा तर अगदी घाणीच्या जवळ ती असत, तो काळ open defecation चा होता) फुले गोळा करून आईला आणत असू , मग आई किंवा बहीण त्याचे छोटे छोटे गजरे करत (केंव्हातरी मी सुद्धा केले आहेत). 
 
त्याचा मंद वास सतत आजूबाजूला असे. 
 
ज्यावेळी मर्ढेकर म्हणतात :
 
 "... जवळुनि गेलिस पेरित अपुल्या/ मंद पावलांमधल्या गंधा"... त्यांच्या मनात नक्कीच बकुळ किंवा बुच असणार...