Wednesday, March 13, 2024

G. A. Kulkarni, Henry van Dyke...जी. ए. कुलकर्णी आणि हेन्री व्हॅन डाईक

 

हे पूर्वी इथे दिले असेल.. पण काहीजणांना कदाचित नव्याने...

जीएंनी 'पिंगळावेळ' मधील यात्रिक ही जबरदस्त अशी रूपक कथा लिहण्या आधी, त्याच नावाची अनुवादीत कथा वाङ्मयशोभाच्या ऑक्टोबर १९६०च्या अंकात प्रसिद्ध केली होती... 
 
मूळ लघुकादंबरी हेन्री व्हॅन डाईक (१८५२-१९३३) यांची आहे, तिचे मूळचे नाव आहे 'The Story of the Other Wise Man', 1895. 
 
जीएंच्या कथेसोबत हेन्री व्हॅन डाईक यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नव्हते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता सुद्धा व्यक्त करण्यात आली नव्हती. 
 
पुरषोत्तम धाक्रस 'आकाशफुले : जी. ए. कुलकर्णी', तिसरी आवृत्ती ', २०१० ह्या पुस्तकाच्या "'सिंहा' वलोकन" मध्ये लिहतात:
"...'यात्रिक'.... हे केवळ अनुवाद आहेत एवढेच कळते. मूळ कथा कोणाच्या वगैरे काहीच आढळत नाही..."
 
त्या कथेच्या पहिल्या पानाचा फोटो सोबत. कृतज्ञता: वाङ्मयशोभा आणि जी ए कुलकर्णी यांच्या वाङ्मयाचे कॉपीराईट होल्डर्स