Monday, December 11, 2023

सांजशकुन अर्पणपत्रिका...Little Bird You Only Hope To Know!

जी ए कुलकर्णींनी त्यांच्या 'सांजशकुन', १९७५ साठी लिहलेली अर्पणपत्रिका (epigraph):

"Over these unremembered marble columns,
birds glide their old remembered way.
Dive in red gold setting tide
And write dark alphabets on evening sky;
Whether an epitaph, chorus or strange augury -
Little man you only hope to know!"

ह्याबद्दल खूप लिहून झालाय , फेसबुक वर :

जंगजंग पछाडून हे verse कुठले आहे हे समजलं नाहीय....मला पहिल्यांदा वाटलं होत ते जीएंच्या आवडत्या Walter de la Mare यांच असाव... पण बहुतेक त्यांच नाहीये ....शिवाय हे कुठल्या लेखक/कवीच असत, तर जीएंनी त्याच/तीच नाव नक्की दिल असत.. मग हे स्वतः जीएंचच आहे काय?

ह्या verse इतके जबरदस्त मी आयुष्यात काही वाचल नाहीय....अधूनमधून संध्याकाळी मी आकाशाकडे पाहतो... त्यावेळी आमच्या इकडे तीन पातळ्यांवर पक्षी फिरत असतात... अगदी खाली चिमणी - कावळे -कबुतर, त्यावरती घार- क्वचित पोपट- पाकोळी.... आणि अगदी वरती कात्रज तलावाच्या ecosystem चे प्राचीन रहिवासी: बगळे....

केवढे व्यस्त असतात.... काय करत असतात हे सगळे? ...

"And write dark alphabets on evening sky;
Whether an epitaph (स्मरणार्थ कोरलेले शब्द), chorus (पालुपद) or strange augury (भविष्यवाणी).... "

ते पाहताना प्रत्येक वेळी हे शब्द माझ्या मनात येतात आणि मी स्तब्ध होतो ...

खरंच किती कमी समजलंय मानवाला ह्या जगाबद्दल आणि उड्या पहा केवढ्या मोठ्या..."


आता कल्पना करूया पक्षांनां आपल्या सारख चालायच आकर्षण निर्माण झालय....

Artist: Ellis Rosen, The New Yorker

p.s 

जीएंच्या इंग्लिश कवितेचा मी मराठीत केलेला अनुवाद:


"ह्या विस्मृतीत गेलेल्या संगमरवरी स्तंभांवरून
पक्षी घेतात त्यांची जुनी आठवणीतील संथ भरारी,
सूर मारतात तांबड्या-सुवर्ण अस्ताला निघालेल्या लाटेत
आणि लिहतात गूढ बाराखडी संध्याकाळच्या आकाशावर;
ते आहेत समाधीवरील शब्द, पालुपद का अपरिचित प्रारब्ध -
खुज्या माणसा ते समजायची तू फक्त आशा धरू शकतोस!"
"
(कृतज्ञता : कै जीए यांच्या वाङ्मयाचे कॉपीराईट होल्डर्स)

ही कविता जीए यांचीच आहे!

"जीएंची पत्रवेळा" मध्ये मे ११ १९७५ रोजी जीए ग्रेस ना लिहतात (पृष्ठ ५६, ५७) :

 "परवा एका जुन्या डायरीत लिहून ठेवलेल्या ओळी पुन्हा दृष्टीस पडल्या. अगदी अचानक. मी त्या विसरूनही गेलो होतो.... हे मराठीत जसेच्या तसे आणता येईल ? बहुदा नाही. पण बघू...".