Friday, March 31, 2023

फॉसबोल साहेबांना जर्मन म्हटलेल बहुदा आवडल नसत!...V. Fausboll's Ten Jatakas, 1872

 

आधुनिक काळात किमान तीन ग्रेट (आणि माझ्या आवडत्या) लोकांनी मराठीत जातक कथा आणल्या आहेत: धर्मानंद कोसंबी, चिं वि जोशी,  दुर्गा भागवत.... 
 
कै. धर्मानंद कोसंबी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात: 
 
"...जातकट्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामीं ज्यांनी परिश्रम केले त्यांत व्ही. फॉसबोल (V. Fausboll) ह्या जर्मन पंडिताला अग्रस्थान दिलें पाहिजे. जर्मनी कोठें आणि सिंहलद्वीप कोठें ! पण 'किं दूरं व्यवसायिनाम्' ह्या न्यायानें या गृहस्थानें तेथून सिंहली ताडपत्री पुस्तकें गोळा करून त्यांच्या आधारावर, दुसर्या कोणाचें साहाय्य नसतां, रोमन अक्षरांनी जातकट्ठकथा छापण्यास १८७७ सालीं आरंभ केला; व १८९६ साली हे काम संपविलें..."
 
पण फॉसबोल (1821-1908) तर डॅनीश होते. ते कोपनहेगन मध्ये संस्कृत शिकवायचे. 
 
अर्काइव्ह.ओआरजी (archive.org) येथे फॉसबोलांचे 'Ten Jatakas. The original Pali text with a translation and notes', 1872 हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यात मला कुठेही जर्मन किंवा जर्मनीचा उल्लेख सापडला नाही. त्यात इंग्लीश आहे आणि रोमन लिपीत लिहलेले पाली आहे. 
 
विकिपीडिया डेन्मार्क बद्दल म्हणतो : 
"...A nascent Danish liberal and national movement gained momentum in the 1830s; after the European Revolutions of 1848, Denmark peacefully became a constitutional monarchy on 5 June 1849. A new constitution established a two-chamber parliament. Denmark faced war against both Prussia and Habsburg Austria in what became known as the Second Schleswig War, lasting from February to October 1864. Denmark was defeated and obliged to cede Schleswig and Holstein to Prussia. This loss came as the latest in the long series of defeats and territorial loss that had begun in the 17th century. After these events, Denmark pursued a policy of neutrality in Europe...."
 
फॉसबोल साहेबांना जर्मन म्हटलेल बहुदा आवडल नसत!