Monday, February 27, 2023

पांढरा रंग आणि जवळ नदी असती तर...Ibrahim Rauza and The Taj Mahal

१९७४साली ज्यावेळी आमच्या शेजारी सौ शाराक्का जोशी, आमची आई, माझी बहीण आरती, माझा भाऊ अभिमन्यू "भैय्या" आणि मी मिरजेहून विजापूरला गेलो होतो त्यावेळी आम्हाला कमी वेळ होता, पुढे आलमट्टीला मुक्कामाला जायचे होते, अखिल भारतीय रेल्वे संपामुळे (जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात) बसना अभूतपूर्व गर्दया होत्या, आणि म्हणून आम्ही फक्त गोलघुमट आणि मुलुखमैदान तोफ बघायला निवडली... 
 
फेब्रुवारी २६ २०१९ ला मात्र आमचा गाईड (परशुराम गोडी, बदामी) आंम्हाला प्रथम इब्राहिम रोजा, १६२७ (Ibrahim Rauza) ला घेऊन गेला आणि माझ्यामते विजयपुरातील ते सर्वोत्कृष्ट monument आहे..... 
 
साधेपणा (Spartan), भव्यता, उदात्तता, चिंतन करायला लावणारी स्मशान शांतता, बाहेर प्रखर उन्हाळा असताना येणारी गार वाऱ्याची झुळूक, जगातील एक सर्वोत्तम वास्तुकला हे सगळ अविस्मरणीय आहे...
त्यात राणी ताज सुलताना यांची पण कबर आहे आणि असे म्हणतात की ताजमहाल ला स्फूर्ती इब्राहिम रोजा पासून मिळाली आहे.... 
 
मी दोन्ही ठिकाणी वेळ घालवला आहे आणि माझ्यामते इब्राहिम रोजा ताज महाल पेक्षा श्रेष्ठ आहे.
आमच्या गाईडच्या मते पांढरा रंग आणि जवळ नदी असती तर ते म्हणण सर्वांना पटल असत!