Saturday, May 07, 2022

आमच्या बोटांना पाकळ्यांचा रेशमी स्पर्श शिकवला...Remembering Durga Bhagwat, 20 Years After Her Death

आज मे ७ २०२२, दुर्गाबाईंना जाऊन २० वर्षे झाली

या एका परिच्छेदात कलावंत दूर्गाबाईंची सर्व शक्तीस्थळे दर्शनास येतात ...

एक स्त्री, एक naturalist , एक चौफेर वाचन असलेली ललित लेखक जिचे लेखन काव्याच्या सीमेवर लीलया जात असते , एक सौन्दर्यासक्त, एक मानवतावादी ....

दुर्गा भागवत:

"... गुलाबपुष्प काही भारतीय फूल नव्हे. आपले फूल कमळच. पण नूरजहाँच्या वेळेपासून गुलाब भारतात बहरला. तो होता लाल लाल वसंत गुलाब नि आपला नेहमीचा सुगंधाची बरसात करणारा लहान, देशी गुलाब. यानेच आपल्याला अत्तर दिले. गुलाबपाणी दिले, गुलकंद दिला. यानेच गरिबांची लहान लहान परसदारेही सुशोभित नि सुवासिक केली. यानेच आम्हाला लहानपणापासून आपल्याबरोबर बागडू दिले. आमच्या बोटांना पाकळ्यांचा रेशमी स्पर्श शिकवला. याच्या अर्धोन्मीलित कळीनेच हसू-रुसूच्या-प्रीतीच्या खेळाचे रहस्य वयात येणाच्या वेळी आम्हाला सुगंधाच्या भाषेत सांगितले. यानेच जीवनाची भंगुरता दाखवली नि अमर सुगंधाच्या आत्म्याची खूण पटवून दिली. वाळल्या तरी पाकळ्या सुगंधी. यानेच आमच्या केसांना शोभा दिली . गंध दिला. यानेच आम्हाला रंग पारखायला शिकवले. यानेच काट्यांचे भयानक अस्तित्व ठायी ठायी असते हे पटवून दिले...."

(पृष्ठ ४६-४७, 'भावसंचित', २०१५, संपादन : मीना वैशंपायन )


The Rose (undated) by Eugene de Blaas (Italian, 1843-1932)