Sunday, January 31, 2021

काळा रंग: संत नामदेव आणि व्यंगचित्रकार ओराल...दोन अभिजात कलाकृती....Black Color....Mardhekar, Beckett, Namdev, Sarwate

बा सी मर्ढेकर:
"...पंक्चरली जरि रात्र दिव्यांनीं,
तरी पंपतो कुणी काळोख; ..."


 
"रात्र  काळी घागर काळी" या नामदेवांच्या गौळणीची माझ्यावर मोहिनी आहे...कितीवेळा ऐकल तरी समाधान होत नाही....




सौजन्य : स कृ जोशी, वाङ्मय शोभा, ऑक्टोबर १९५८

.... आणि या गौळणीसारखीच या चित्राची पण..

 

व्यंगचित्रकार: ओराल

कै वसंत सरवटे काय म्हणतात पहा:

'व्यंगकला-चित्रकला', वसंत सरवटे, २००५

सौजन्य : सरवटेंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
 
ओराल यांच्या चित्रात काळा रंग घोर निराशा, कदाचित अंतिम पाडाव घेऊन आलाय, सरवटे म्हणतात तस चित्त गोठवून टाकणारा आहे..

पण नामदेवांच्या गौळणीत तो सौंदर्याचा वाहक आहे ...मोहक आहे.. रात्रीच्या व  पर्यायाने जीवनाच्या प्रेमात पाडवणारा आहे....दिवस उगवेलच  पण काळी रात्रच व तिच्या सारख काळ असलेले आणि तिच्या मुळ काळ झालेल सगळच किती सुंदर आहे...

दोन्ही कलाकृती अभिजात आहेत ....