Thursday, February 27, 2020

न तथा बाधते शीतं यथा बाधति बाधते....Lay Down, Lie Down

#कुसुमाग्रज१०८  #kusumagraj108 #मराठीभाषादिन

मी लहानपणी भोजराजा -कालिदासाची म्हणून वाचलेली गोष्ट: 

एक कालिदासाच्या गावाला भेट देणाऱ्या माणसाने , कालिदासाच्या घराबाहेर थंडीच्या दिवसात सकाळी रांगोळी काढत असणाऱ्या स्त्रीला विचारले की तुला थंडी वाजत नाहीये का?

ते विचारताना त्याने 'बाधणे' या संस्कृत क्रियापदाचे योग्य रूप वापरले नाही.

त्याला उत्तर मिळाले : 'न तथा बाधते शीतं यथा बाधति बाधते'... थंडी अयोग्य व्याकरणाइतकी त्रासदायक नाहीये! त्या कथेबरोबर एक चित्र सुद्धा होते ज्यात रांगोळी काढता , काढता स्त्री वर मान करून ते उत्तर देतीय अस दाखवणार. (मला तो रस्ता आणि अंगण आमच्या मिरजेच्या घरासमोरचे वाटायचे. तशी वाचलेली प्रत्येक गोष्ट मी माझ्या परिचित मिरजेत आणून फिट करायचो म्हणा!)

ह्या बद्दल बरेच लिहण्यासारखे आहे आणि थोडेफार लिहले पण आहे पण हे कार्टून बघून वरील कथा आठवली.

Artist: Harry Bliss