Thursday, November 14, 2019

अप्पलपोट्या पण राक्षस नाही... Oscar Wilde's and Lisbeth Zwerger's The Selfish Giant

माझ्या नुकत्याच (ऑक्टोबर २२, २०१९) वारलेल्या वडिलांनी (गोपाल दत्त कुलकर्णी) यांनी ऑस्कर वाइल्ड यांच्या 'द सेल्फिश जायंट' , १८८८ चा अनुवाद 'प्रेमाची फुले', १९७३ या कथासंग्रहात 'अप्पलपोट्या राक्षस' या नावाने प्रसिद्ध केला. हे पूर्वी या ब्लॉग वर उल्लेखले होते. 

त्या कथेचे हे पहिले पान,


माझ्या चित्रकार, व्यंगचित्रकार भावाने (अभिमन्यु कुलकर्णी) याने माझ्या कॉपीमध्ये केलेले उत्कृष्ट रेखाटन पहा.

माझ्या वडिलांच्या शीर्षकामुळॆ, अनुवादामुळे  त्याचा गैरसमज झालाय. Giant म्हणजे राक्षस नाही तर थोराड, धिप्पाड माणूस!

आता Lisbeth Zwerger (b १९५४ -) यांनी ह्या कथेसाठी केलेले १९८४ साली केलेले एक रेखाटन पहा



 आता कसा 'अप्पलपोट्या राक्षस' माणसात आलाय...