Friday, November 08, 2019

मध्यमवर्गाला कलांचा रसिक बनवायचा प्रयत्न करणारा आणि अर्थात स्मरणरंजनाचा बादशहा .... Pu La@100

#PuLa100

Today November 8 2019 is 100th birth anniversary of P L Deshpande


Nicholas Carr:

“Nostalgia is nothing new. It has been a refrain of art and literature at least since Homer set Odysseus on Calypso's island and had him yearn to turn back time.

But Reynolds makes a convincing case that today's retromania is different in degree and in kind from anything we've experienced before. And it is not just an affliction of the mainstream. It has also warped the perspective of the avant-garde, dulling culture's cutting edge. It's one thing for old folks to look backwards. It's another thing -- and a far more lamentable one -- for young people to feed on the past. Somebody needs to figure out a new way to smash a guitar.” 
(The New Republic, September 2 2011)

पहिली गोष्ट:  गोविंदराव टेंबे, ना. सी. फडके यांच्या पावलावर पाऊल टाकत पुलंनी हिंदुस्तानी क्लासिकल संगीत मराठी मध्यमवर्गीयांत लोकप्रिय करायचा अथक प्रयत्न केला. तसेच बा सी मर्ढेकर अनेक लोकांना माहिती झाले देशपांडे कुटुंबामुळे.

दुसरी गोष्ट, बादशाह म्हटल म्हणजे त्याच्या नावाने पाडलेली नाणी आली.  त्यातील एक नाण सोबतच्या चित्रात पहा.


कलाकार : वसंत सरवटे 

ह्या अंकातील मला सर्वात काय आवडल असेल तर : मुखपृष्ठ.  आणि आज ते पाहताना एक गम्मत वाटते. 'पुल १००'. म्हणजे २००० सालीच पुल १०० celebrate झाले आहे. 

नाण सोनेरी आहे.  नाण्यावरील मुद्रे साठी मुखवटे दूर केलेत. आणि सामोर आलाय सर्वसामान्यांसारखा म्हातारा झालेला बादशहा.