Monday, October 21, 2019

शिशिरागम... Sempe's Autumn Sonata

बा सी मर्ढेकर:
"शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पण गळावया
कां लागतां मज येतसे
न कळे उगाच रडावया.
..."
('शिशिरागम', पृष्ठ २०, 'मर्ढेकरांची कविता', १९५९/ १९७७)


कलाकार :  Jean-Jacques Sempe, द न्यू यॉर्कर, ऑक्टोबर २०,१९८०

सेंपे ह्या वसंत सरवटे यांच्या आवडत्या कलाकाराच्या मुखपृष्ठाकडे पहा.

कदाचित दुपारी घराच्या अंगणात टी पार्टी चालू असावी, त्या स्त्रिया थंडीची वस्त्रे विणत असाव्यात (उजवीकडचे टेबल पहा). ते सगळे बाजूला ठेऊन आता मेहफिल रंगली आहे. घरातील एक छोटी मुलगी पण त्यात शामील झाली आहे. फॉलची, मर्ढेकरांना रडवणारी, पाने पडत आहेत. मी म्हणेन Autumn Sonata सुरु आहे....