Thursday, December 13, 2018

....ही 'आपली' अमेरिका ....Republican Presidents From March 1861 - December 2018

'आपली' कारण आपले कित्येक नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचे नातेवाईक, ओळखीच्या माणसांचे नातेवाईक, मुलांचे मित्र-मैत्रिणी , टीव्ही वर दिसणाऱ्या लोकांचे नातेवाईक, अनोळखी माणसांचे नातेवाईक, होणाऱ्या नातेवाईकांचे नातेवाईक तिथे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना भारतात परत यायच नसत.... तेंव्हा ती लोक आपली असतील तर त्यांचा देश पण आपला झालाच!

Artist: Andy Thomas, c 2018

लिंकन (पाठमोरे) आणि आयसेनहावर (लिंकन यांच्या समोर बसलेले) सोडेले तर उर्वरित जगाने चित्राकडे पाहून चळाचळा कापावे आणि कापता कापता प्रचंड हसावे अशी परिस्थिती आहे.... ....

ह्या चित्राकडे मी एक कॅप्शन नसलेले कार्टून म्हणून पण पाहतोय आणि त्याला काय कॅप्शन जोडता येईल याचा विचार करतोय....

टेडी रूसवेल्ट : "एब आणि आइक तुम्ही थोडे गप्प बसा आणि ऐका ... डॉलर ते आण्विक हत्यारे असे कुठलेही मार्ग वापरून असं साम्राज्य निर्माण करू की जगाला वाटेल याच्या तुलनेत रोमन, मंगोल, आणि ब्रिटिश साम्राज्य हे लुटुपुटुचे खेळ होते.... आणि विरोधी डेमोक्रॅट्स आपल्याला  यामध्ये नक्की साथ देतील.... "