Tuesday, October 23, 2018

अँस्टेरिक्स आणि काफ्का ना जोडणारा दुवा.....Anthea Bell Dies


“.....(Anthea) Bell, who worked from both French and German, translated texts by authors including Sebald, Stefan Zweig, Franz Kafka and Sigmund Freud. She first began translating Asterix in 1969, coming up with some of its best jokes and puns. In her version, Obelix’s small dog Idéfix became Dogmatix, and the druid Panoramix became Getafix. The Oxford Guide to Literature in English Translation describes her work on Asterix as ingenious and superbly recreated, displaying “the art of the translator at its best”....
...(Will) Self said that he had read Bell’s translations all his life, five years ago convening a translators’ symposium to discuss the “vexed problem” of translating Kafka, at which Bell shone. “Particularly inspiring was her analysis of his humour as a writer – incomprehensible to English readers until mediated by this very fine and very great mind,” he said....”

 (Alison Flood, The Guardian, October 18, 2018

मी आयुष्यात अँस्टेरिक्स कॉमिक्स वाचले वयाच्या २१व्या वर्षी , १९८१-८२ साली (आयआयटी मद्रासच्या अलकनंदा आणि ब्रह्मपुत्रा होस्टल्सच्या लेन्डिंग लायब्ररीमुळे ) आणि त्याच्या प्रेमातच पडलो. पुढील काही महिन्यात सर्व अँस्टेरिक्स संपवले. ते वाचताना जाणवायच की हे भाषांतर फार सुंदर झाल आहे... पण ते कोण करायच ह्या कडे कधी लक्ष दिल नव्हत, ऑक्टोबर २० २०१८ पर्यंत! 

('अँस्टेरिक्स' अत्यंत महाग, 'महाबली वेताळ' पण फार परवडायच नाही.... भारतातील कित्येक पिढ्या कॉमिक्स ला मुकल्या आर्थिक कारणांमुळे. मला स्वतःला सर्व सुपरहिरो- Batman, Superman, Wonder Woman, Spider-Man इत्यादी  - टीव्ही किंवा सिनेमामुळे पहिल्यांदा समजले, पुस्तकांतून नाही.)

पूर्वी लिहलय त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी स्टीफन झ्वैग यांची काही पुस्तके मराठीत आणली आहेत पण ती जर्मन मधून इंग्लिश मध्ये कोणी आणली याकडे कधी लक्ष दिले नव्हते, ऑक्टोबर २० २०१८ पर्यंत!

Sebald, Kafka, Freud सगळे आवडते.. जास्त कमी वाचलेले.. Anthea Bell बाईंचे आपल्यावर उपकार आहेत...  शिवाय विल सेल्फ (Will Self) अतिशय आवडते टीकाकार, भाष्यकार... ते एवढ कौतुक करतात म्हटल्यावर काहीच शंका उरली नाही...

courtesy: copyright holders of Asterix comics and Oliver Kamm