Sunday, August 26, 2018

बेसिल डी'ऑलिव्हिएरा महाराष्ट्र टाइम्स च्या पहिल्या आणि शेवटच्या पानांवर....Basil D’Oliveira in Maharashtra Times

Matthew Engel, The Guardian, August 23 2018:

“....D’Oliveira was born in South Africa, in the mixed-race “Cape Coloured” community, confined under the apartheid system of racial segregation to playing only on the rutted tracks of the ghettoes....
On 23 August 1968 Basil D’Oliveira scored 158 at the Oval against Australia, an innings that won the Test, drew the series and made him, so we thought, a certainty for the South Africa tour that winter. Four days later the panel met to choose the touring party. The names were announced on the radio next day. The alphabetical list went straight from Cowdrey to Edrich. It took D’Oliveira a moment to grasp what that meant. It was the lowest point of an astonishing journey.....
England did not play them again until 1994 and in the meantime the sporting boycott proved a major factor in throttling white rule....”

बेसिल डी'ऑलिव्हिएरा हे प्राथमिक शाळेतल्या मला १९६७पासून माहित होते- दोन कारणांसाठी:

१. त्यांचे डबल बॅरेल नाव:  नाव, वडिलांचे नाव, आडनाव नुकतच सांगायला शिकलेल्या, इंग्लिश न येत असलेल्या मला आडनाव दोन भागात असणे हे लक्षात राहण्यासारखे होते.
२. त्यांनी १९६७च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्याच कसोटी सामन्यात काढलेले शतक. त्याशिवाय १९६७साली ते विस्डेनचे वर्षाचे क्रिकेटर सुद्धा झाले होते.

ह्या सगळ्यामुळे मला वाटतय की टेस्ट क्रिकेट फॉलो करणाऱ्या भारतीयांना ते १९६७ साली अगदी परिचित झाले असावेत.

पण अजून जात, धर्म म्हणजे काय हे सुद्धा माहित नसलेल्या ८वर्षाच्या मला १९६८साली त्यांच्या संबंधाने जो त्यांच्या वर्णावरून जगभर गदारोळ झाला तो समजलाच नव्हता! तो वडिलांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट नक्की: त्यांचे नाव, महाराष्ट्र टाइम्स च्या पहिल्या आणि शेवटच्या पानांवर (त्याकाळात पेपर मध्ये खूप कमी पाने असत) त्यावर्षी आले.  (मला नक्की आठवत नाही पण त्यांचे नाव बहुदा मराठी मध्ये कधी कधी डॉलिव्हिएरा असे लिहिले जात असावे.)

त्यानंतर गेल्या पन्नास वर्षात क्रिकेट वरून राजकारणाच्या पुष्कळ बातम्या पहिल्या पानावर आल्या, पण माझ्या आयुष्यातील, इतिहासाला थोडीफार कलाटणी देणारी, क्रिकेट संबंधातील घटना फक्त बेसिल डी'ऑलिव्हिएरा प्रकरणाचीच. 

आणखी एक गोष्ट,  त्यावेळी जरी नीट समजली नसली तरी ब्रिटन बद्दल चांगल वाटाव अशी ही माझ्या आयुष्यातील पहिली गोष्ट होती. कसलाही स्वार्थ न पाहता, realpolitik दुर्लक्षून केवळ तत्वासाठी इंग्लंडने जगाचे राजकारण ढवळून टाकले होते. 



D’Oliveira, the Oval against Australia, 1968


Photograph: Keystone/Getty Images