Tuesday, June 12, 2018

लिटररी रिव्यू साठी लक्ष्मण माने अजून उपरे!....Can We Really Trust Prestigious Foreign Magazines?

Swapan Dasgupta, The Times of India, June 17 2018:
"....in India at least, the foreign media mirrors the local English-language media. Apart from Kashmiri separatists, human rights and NGO activists and a small clutch of English-speaking politicians, the primary contact of foreign journalists are Indian journalists..."

लिटररी रिव्यूचा दबदबा आहे. मला स्वतःला ते आवडते. माझ्याकडे त्याची वर्गणी नाही. त्यामुळे पेवॉल च्या पलीकडचे लेख वाचता येत नाहीत तरी सुद्धा जेवढं वाचायला मिळत त्यात बऱ्याच वेळा आनंद वाटतो.

पण जून २०१८चा अंक घ्या. त्यात केशव गुहा यांनी सुजाता गिडला यांच्या 'Ants Among Elephants: An Untouchable Family and the Making of Modern India', २०१७च्या पुस्तकाचे परिक्षण लिहले आहे.

त्यातील शेवटचे दोन परिच्छेद पहा:

"... The book’s British and American publishers have promoted it as the untold story of India’s Dalits. This is not a harmless promotional claim. It imposes on Gidla’s book a wholly undue burden of representation, one that would never be applied to, say, a work by a Brahmin writer. It is also untrue. In terms of detail and narrative skill, Gidla’s stands alone, but it is also part of a tradition that includes such writers as Omprakash Valmiki, Narendra Jadhav and Siddalingaiah (to mention only those with memoirs available in English). Another Dalit, Meena Kandasamy, has just been shortlisted for the Women’s Prize for Fiction. 

It would be a shame if British readers thought that this book told ‘the Dalit story’ and thus took care of the matter. Dalits are just as underrepesented in publishing as elsewhere, including in what is transmitted from India to the West. To cite just one example, Devanur Mahadeva, widely regarded as one of the greatest modern Indian writers, has scarcely been published in English and never in this country. Ants Among Elephants will, one can still hope, be the book that changes all that."

म्हणजे गुहांची वंचित समाजांतून आलेल्या लेखकांची यादी ओमप्रकाश वाल्मिकींपासून पासून सुरु होणार?... दया पवार, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ (माझी यादी एवढीच आहे) त्यात नाहीत? त्यांचे साहित्य इंग्लिश/ फ्रेंच/ जर्मन  मध्ये येवो ना येवो, श्री. गुहांना ते लेखक माहित नाहीत? (बलुत इंग्लिश मध्ये आहे. उपरा इंग्लिश मध्ये आहे. ढसाळ तर दिलीप चित्रेंनी अनुवादिले आहेत.)

उपरा, १९८० आणि बलुतं, १९७८ ही दोन्ही पुस्तके मी प्रकाशित झालेल्या वर्षी , वयाच्या २१व्या वर्षाच्या आत,  वाचली आहेत, नामदेव ढसाळ तर मराठीच्या पुस्तकात होते आणि त्यांची कविता प्रथमदर्शनीच  प्रचंड आवडली.

'बलुत' वाचून वाईट वाटल पण पुस्तक काही फार आवडल नाही पण 'उपरा' ने हादरून आणि आनंदून गेलो. नामदेव ढसाळ तर तुकाराम, मर्ढेकर, कोलटकर यांच्या बरोबरीचा दर्जेदार  कवी आणि विलास सारंग लक्ष्मण मानेंची (मूळची भाषा तेलुगू) तुलना हेमिंग्वे आणि दुर्गाबाई भागवतांशी करतात. ('लिहित्या लेखकाचं वाचन', २०११)

लिटररी रिव्यू चे जाऊदे पण फक्त इंग्लिश मध्ये लिहणाऱ्या  बहुतेक भारतीय लेखकांबद्दल मी कायम साशंक असतो. उदाहरणार्थ : माझा य दि फडकेंवर रामचंद्र गुहांपेक्षा कित्येकपटीने जास्त विश्वास आहे कारण फडकेंनी (प्रामुख्याने) मराठी साधने अभ्यासून  महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास लिहला आहे. ह्या विषयावर मी ह्याच  ब्लॉगवर इतरत्र विस्ताराने लिहले आहे.

एकच उदाहरण देतो, जानेवारी १४ २०१८च्या पोस्टचे:
 "रामचंद्र गुहा हे महाराष्ट्रातील पुणे-मुंबईतील आणि इंग्लंडमधील वर्तमानपत्रांचे आवडते इतिहासकार. त्यांचे 'India After Gandhi: The History of the World's Largest Democracy', २००७ पुस्तक गाजलेले, मराठीत अनुवाद झालेले. त्यातील 'Autumn of the Matriarch' ह्या प्रकरणात खालील माहिती आहे:

"...The debates on India’s population size dated from the earliest days of Independence. Social workers had set up a Family Planning Association of India in 1949. The Planning Commission had spoken of the importance of family planning since its inception in 1950–1. However, culture and economics worked in favour of large families. The biases in educational development meant that girls were still valued more as child-bearers than as wage-earners. The continuing dependence on agriculture placed a premium on children. Indian Muslims and Catholics were enjoined by their clergy to abjure family planning...."

ज्या  माणसाने आपले सर्वस्व त्याकारणी लावल होत त्या  कर्वेंचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात कोठेही नाही! (गुहांच्या 'Makers of Modern India', २०१० या पुस्तकात सुद्धा र. धों चा उल्लेख कोठेही नाही.)"

सौजन्य : संबंधित कलाकार