Saturday, May 05, 2018

आधुनिक हिंदच्या खऱ्या नवयुगाचा जन्म या क्रांतिकार्यांच्या विजयानेच होणार आहे ...Karl Marx@200

#KarlMarx200
Today May 5 2018 is 200th birth anniversary of Karl Marx

D K Bedekar, Vangmay Shobha, August 1949:
दि के बेडेकर, वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९४९:


Mary Gabriel, ‘Love and Capital: Karl and Jenny Marx and the Birth of a Revolution’:

“...The picture that gradually emerged was of a family that sacrificed everything for an idea the world would come to know as Marxism but which existed in their lifetimes largely inside Karl Marx’s brain. Egress of his ideas was continually thwarted.

The story I discovered was of a love between a husband and wife that remained passionate and consuming despite the deaths of four children, poverty, illness, social ostracism, and the ultimate betrayal, when Marx fathered another woman’s child. It was the story of three young women who adored their father and dedicated themselves to his grand idea, even at the cost of their own dreams, even at the cost of their own children. It was the story of a group of brilliant, combative, exasperating, funny, passionate, and ultimately tragic figures caught up in the revolutions sweeping nineteenth-century Europe. It was, above all, the story of hopes dashed against the bulwark of bitter reality, personal and political...”
 
Jason Barker, The New York Times, April 30 2018:
"...The key factor in Marx’s intellectual legacy in our present-day society is not “philosophy” but “critique,” or what he described in 1843 as “the ruthless criticism of all that exists: ruthless both in the sense of not being afraid of the results it arrives at and in the sense of being just as little afraid of conflict with the powers that be.” “The philosophers have only interpreted the world, in various ways; the point is to change it,” he wrote in 1845...."

आज कार्ल मार्क्स यांची २००वी जयंती.
जीएंनी मार्क्सवादावर सडकून टीका केली आहे. ती माझ्या ब्लॉगच्या एका वर्षांपूर्वीच्या पोस्टवर (http://searchingforlaugh.blogspot.in/…/karl-marx-will-soon-…) आली होती.

"...तेव्हा अखेर प्रत्येकाला जाता जाता स्वतःचेच 'तत्वज्ञान' बनवत जगण्याखेरीज काही मार्ग दिसत नाही., कारण धर्माचे मूळ स्वरूप सदैव वैयक्तिकच राहणार. Institutionalized religion म्हणजे एक fraud आहे, किंवा स्काऊट, रोटरी, लायन चळवळीपेक्षा तिला महत्व नाही. ज्यावेळी धर्मच अपुरा पडू लागला तेव्हा काही जणांना Marxism सारखे secular तत्वज्ञान समाधान देऊ शकले. पण त्याबाबतही मी अगदी असाध्य कोडगा ठरतो. त्याच्याइतके अनाकर्षक, वैराण, हमाली तत्वज्ञान मला कुठे आढळले नाही...मार्क्सवादी माणसाचे चित्र काढायचे झाल्यास ठोकळ्यावर ठोकळे ठेवलेली आकृती काढली की पुरे..."
(पृष्ठ १७९, 'जी एंची निवडक पत्रे', खंड १, १९९५)

त्यांच्या स्वामी ह्या कथेकडे स्टालिनच्या काळातील सोवियत रशियामधील जीवनाचे रूपक कथा (allegory) म्हणून पाहता येईल.

पण आज मला जीएंचे दुसरे अवतरण आठवते.
"...त्याने प्रेमाचा व शांतीचा संदेश सांगितला, पण प्रसार झाला तो तलवारीच्या जोरावर; त्याने निरिच्छ्तेवर भर दिला, तर आता त्याच्या धर्माचा आधार आहे संपत्ती. हा तुला त्याचा विजय वाटतो, तसे पाहिले तर त्याचे सच्चे अनुयायी एखाद्या खेड्यातील वसतीपेक्षा जास्त नसतील. पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्व कमी होते?..."
('यात्रिक', 'पिंगळावेळ', 1977)

आपल्याला बहुतेकांना माहित आहे की जीएंनी हे येसू आणि ख्रिश्चन धर्माबद्दल म्हटले आहे. मला आज वाटते हे मार्क्स आणि त्याच्या नावाने ज्या कम्युनिझम चा प्रसार झाला त्याला सुद्धा लागू आहे.

लेनिन, स्टालिन, माओ वगैरे क्रूरात्मे किंवा भारतातले अप्पलपोटे, बडबडे, टीव्ही, पुस्तक, फेसबुक आणि वर्तमानपत्रात आढळणारे समाजवादी, म्हणजे कार्ल आणि त्याची शिकवण नव्हे.... "त्याचे सच्चे अनुयायी एखाद्या खेड्यातील वसतीपेक्षा जास्त नसतील".... "पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्व कमी होते?"

असाच एक कार्लचा सच्चा अनुयायी म्हणजे मला दि के बेडेकर वाटतात. वर दिलेले त्यांचे quotation वाचा....  इतका आशावाद, इतका भाबडेपणा, इतका सज्जनपणा, इतकी सचोटी...आज जगभर कम्युनिझम कोलमडून पडला असला तरी हेलावून टाकते... (btw बा सी मर्ढेकरांच्या कवितांचे सुंदर परिक्षण करणारे दि के बेडेकर जीए म्हणतात - "ठोकळ्यावर ठोकळे ठेवलेली आकृती काढली की पुरे"- तसे अजिबात नव्हते!)


Best known for lyric poetry and praised profusely by Nietzsche for the use of German language but whose writings were abhorred by the Nazis, Heinrich Heine sitting with Jenny and Karl Marx, standing, 1848
courtesy: AKG Images