Thursday, December 07, 2017

आसन्नमरण राणी...Spectacular Evidence of an Age of Artistic Eloquence at Ajanta Verul


John Keay, ‘India: A History’:

“...At Ajanta more than anywhere the golden age of the Guptas is made manifest. Theories and dreams, like epigraphic uncertainties and semantic niceties, crumble into dry-as-dust irrelevance beside such spectacular evidence of an age of artistic eloquence. The confidence of the draughtsmanship and portraiture, the vitality and intricacy of the compositions, and the skilful use of the palette combine in scenes martial, devotional and sublimely sensual to convey irrefutable proof of a remarkable age...”

नोव्हेंबर २०१७ मी अजंठा आणि वेरूळ पहिल्यांदा पहिली... त्या दोन्ही ठिकाणांवर इतके लिहल गेलय की मला लिह्ण्यापेक्षा वाचावस जास्त वाटत. तरी दोन-चार गोष्टी आत्ता लिहतो....

१> इतक जरी लिहल गेल असल तरी त्यांच्या इतिहासाबद्दल बरीच अनिश्चीत्तता. किती खर्च आला (अमाप), तो पैसा कशा पद्धतीने उभा केला गेला? नक्की माहित नाही. एकाही कलाकाराचे नाव खात्रीने माहित नाही. आत्ताच्या सेलिब्रिटी एज ला अगदी विसंगत आणि त्यातच भारतीय संस्कृतीची खुबी. कोणी केल यापेक्षा काय केलं,  कशासाठी केल, किती टिकल याला जास्त महत्व.
आणखी एक प्रश्न पडतो: माझ्या सारख्या किती सामान्य लोकांनी अजंठा पाहिल असेल इ. स पू २०० पासून इ स ५०० पर्यंत? किंवा त्यानंतर सुद्धा १९वे शतक सुरु होईपर्यंत? कारण तिथे जाणे सुद्धा इतके अवघड होते. (खाली वाचा.)

२> ही लेणी तयार कशी झाली हे वाचल की ती अधिक थरारक सुंदर वाटायला लागतात.  सायमन विंचेस्टर , न्यूयॉर्क टाइम्स च्या नोव्हेंबर ५ २००६च्या लेखात लिहतात: 


"... Stone carvers set out to work. They first made themselves secure by belaying themselves from ropes anchored high up on the cliffs, lowered themselves perhaps a hundred feet down from the lip, and started chipping away into the rock face, beginning high up, fashioning what would in time become the cave's roof.
Once they had incised a narrow letter-box-like opening a hundred or so feet into the cliff, they began to carve downward. But they didn't simply cut downward to make an enormous void. They had planned something far more complex, and so in their descending journey they deliberately left uncarved parts of the rock that would in time become shaped into pillars, elephants, camels and other creatures. The rock was very hard: the process of carving the bare stubs of the cave-inhabitants and cave-menageries and cave-furniture would take many years to complete.
But eventually the carving was done, whereupon the painters moved in. These were artists who were ordered either to paint the statues, or parts of them or, more importantly, to create painting on the roofs and walls of the caves. This they did with great flamboyance and bravura, while using a palette of only six colors, all of them natural -- red and yellow ochre, black and white, malachite green and a blue of crushed lapis lazuli, found in abundance nearby.
They poured pools of water into shallow depressions they had made in the floors to act as mirrors, to help reflect outside sunlight up onto the dark ceilings on which they painted. They produced murals, not frescoes, the plaster on which they applied their paint having to be dry, not wet, with the consequence that the paintings have an extraordinary fragility. Today's visitors are warned ceaselessly not to touch them; some are protected with layers of shellac; others have glass or plastic shields in place; a distressing number remain ruined, damaged by careless visitors of the last century. The pictures that are intact are breathtakingly lovely -- the artists painted with extraordinary delicacy and dexterity beautiful, full-breasted young women, peacocks, horses, flowers, deer -- everything except the Buddha, which in those days was proscribed in imagery..." 


३> इतकी लेणी पहिली पण आत्तापर्यंत केंव्हाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (Archeological Survey of India अर्थात ASI) तांत्रिक शाखेतील कोणाची भेट झाली नव्हती. ती २८ नोव्हेंबर ला अजंठाच्या  गुहा क्रमांक २६ मध्ये झाली. श्री. वसंत पगारे Restoration वरती ठिकठिकाणी काम करतात. उदा: खालील चित्रातील लवंडलेल्या बुद्धावरती, पंढरपुरातील विठ्ठलमूर्तीवर त्यांनी पुष्कळ काम केले आहे. ते त्या गुहेत काम करत होते. त्यांना मी प्रश्न विचारल्यावर मोठ्या आनंदानी आणि उत्साहानी माहिती सांगितली.

त्यांचे नाव बहुतेकांना ठावूक नसेल पण वसंत पगारे महाराष्ट्राला मिळालेल्या हजारो वर्षांच्या शिल्पी परंपरेचा भाग आहेत. कदाचित प्राकृत -मराठी बोलणारे पगारेंचे आणि, काय सांगावे, माझे पूर्वज सुद्धा अजंठाच्या, वेरूळच्या  निर्मितीत कुठेतरी सहभागी असतील.

मी त्यांना कै द ग गोडसेंची 'शिल्पी महाराष्ट्र'ची कल्पना सांगितली, ती त्यांना अतिशय पटली.

छायाचित्र : जयदत्त कुलकर्णी , आयफोन ७
पगारेंनी, त्याकाळच्या '3D' चित्राचा नमुना म्हणून,  छतावरील खालील चित्र दाखवले... कुठूनही त्याकडे पहिले तरी ते आपल्याकडेच पाहतय असं वाटत

 छायाचित्र : जयदत्त कुलकर्णी , आयफोन ७

४> जपानी पर्यटक मोठ्या संख्येने अजंठाला भेट देतात हे ऐकले होते. आणि त्यांचे स्वागतच आहे. पण त्या दिवशी त्यांनी बराच वेळ, मध्यभागी प्रार्थनेला बसून, गुहा २६ जवळजवळ अडवूनच टाकली होती. शिवाय प्रार्थनेचा आवाज मोठा होता. मला हे जरा खटकले. माझ्या मुलावर तर, तो मध्ये येतोय म्हणत, त्यांच्यातील एकजण थोडा खेकसलाच. मला जपानी लोकांकडून हे अपेक्षित नव्हते.

५> 'आसन्नमरण काळी राणी' या नावाचा मूळ दिवाळी १९६४चा लेख (आता 'पैस', १९७०-१९८८ मध्ये समाविष्ट) आम्हाला higher मराठीला १९७४-७७ या काळात एकदा धडा म्हणून होता.

ते नाव मेंदूला जे चिकटल ते कायमच. १४-१६ वर्षाच्या मुलाला खर म्हणजे तो लेख जड आहे. मला तो त्यावेळी फार समजलाच नव्हता. कसला संसार आणि कसला त्याग समजतोय त्या वयात. मुली मात्र सुंदर दिसायला लागल्या होत्या.... खायला तर आवडायचेच....

अजंठात पाय ठेवल्या क्षणी 'आसन्नमरण काळी राणी आठवली'... आता अजंठ्याला फार कमी चित्र स्पष्ट दिसतात आणि कल्पनाशक्ती वापरायला लागते... पण दुर्गाबाईंच्या मदतीने दिसेल तसे ते चित्र पहिले आणि परत आल्यावर पुन्हा एकदा लेख वाचला आणि दुर्गाबाई किती original विचार करणाऱ्या होत्या हे पुन्हा एकदा समजले.... यशोधरा आणि आ का रा या दोघींमधला फरक त्यांनी केवढ्या कोमलपणे पण स्पष्ट शब्दात दाखवलाय...'पैस' मधला एकएक लेख अजंठाच्या चित्रांसारखा आहे...No wonder जीं ए 'पैस ' च्या प्रेमात पडले....विलास सारंग दुर्गाबाईंच्या संपूर्ण लेखनाच्या प्रेमात पडले....

सौजन्य : दुर्गाबाईंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स

'Dying Princess', Ajanta Cave 16

courtesy: Archeological Survey of India