Thursday, July 06, 2017

कै. व्ही शांताराम यांचा द्रष्टेपणा ...'हिंदोस्तान'चा युवक नि 'चीन'ची युवति यांचा विवाह झाला - आणि त्या विवाहानें ९००,०००,००० लोकांमध्ये कायमचा स्नेहभाव निर्माण झाला ...India-China: A Love Gone Sour

Zhou Enlai on the success of the 1789 French Revolution:
 "It's too early to tell."

John Keay:
“...Though China had been (J. L.) Nehru’s biggest mistake, Kashmir was his greatest failure....”

(‘India: A History'. Revised and Updated, 2010)

A. G. Noorani, Frontline, October 2015:

“In 1960, India lost a chance to settle the border disagreement with China. China’s position has since hardened, and the concessions that Zhou Enlai was willing to make then are off the negotiating table now.”

खालील सिनेमा पोस्टर पहा.

'हिंदोस्तान'चा युवक नि 'चीन'ची युवति यांचा विवाह झाला - आणि त्या विवाहानें ९००,०००,००० लोकांमध्ये कायमचा स्नेहभाव निर्माण झाला'....[सध्या , गुगल नुसार, ९००,०००,००० (नव्वद कोटी) नव्हे तर २,६८२,०००,००० ( दोनशेअडुसष्ट कोटी)! ]... दुर्दैवाने तो  (कायमचा स्नेहभाव) झाला असला तरी फार वर्ष टिकला नाही...

श्री अमीर खान यांचा 'दंगल', २०१६ चीनमध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे असे म्हणतात पण सध्या वेगवेगळ्या कारणांनी दोन देशातील तणाव प्रचंड वाढला आहे...

तो  नक्कीच कमी होईल पण त्या पार्श्वभूमीवर वाङ्मयशोभेच्या मे १९४६च्या अंकातील जाहिरात पाहून बरे वाटले....

कै. व्ही शांताराम यांच्या द्रष्टेपणाला या निमित्ताने दाद दिली पाहिजे...१९४५-४६ साली त्यांना हे समजत होत  की भारत-चीन स्नेहभाव हा आशियाच्या, जगाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ते...लक्षात घ्या त्यावेळी राजकीय परिस्थिती आत्तापेक्षा अतिशय वेगळी होती. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते, चीन मध्ये यादवी युद्ध सुरु होते आणि भारत अजून स्वतंत्र व्हायचा होता.

दुसरी एक गोष्ट - एक 'साधा' मराठी माणूस (डॉक्टर कोटणीस) शांतता नोबेल पुरस्काराच्या योग्यतेच काम करून गेला आहे. 


सौजन्य: वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम

या कहाणी सारखीच आणखी एक प्रेमकहाणी तयार होते आहे असे बऱ्याच काळ, बऱ्याच जणांना वाटत होते ....


नेहरू आणि चु एन-लाय , बेजींग , ऑक्टोबर १९५४...हिंदी-चिनी भाईभाई काळात

सौजन्य: THE HINDU ARCHIVES

पण तसे अजिबात घडले नाही , त्याऐवजी युद्ध झाल... जे एका अर्थाने अजून संपलेले नाही....