Wednesday, November 02, 2016

यमुना खळी खेळू खेळ मीनाक्षी का...Meenakshi Shirodkar@100

यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता?
 
मला लिहायला अतिशय खेद  वाटतोय की कै. मीनाक्षी शिरोडकरांच्या (११/१०/१९१६-३/६/१९९७) जन्मशताब्दीची सांगता ऑक्टोबर ११ २०१६ रोजी झाली आणि त्याबद्दल एक अक्षर सुद्धा मी कोठे वाचले नाही....(मी जास्त वाचतो असे नाही तरी!)

किती गाजवली होती त्यांनी सिनेसृष्टी एकेकाळी....

मी ज्यावेळी त्यांचा मराठी 'ब्रह्मचारी'तील (१९३८)- माझा अतिशय आवडता सिनेमा-  'बिकिनी' प्रवेश पहिल्यांदा, कित्येक वर्षांपूर्वी, पहिला त्यावेळी त्या मला अतिशय आकर्षक वाटल्या... असे म्हणतात की एक अत्यंत गाजलेला मराठी इतिहासकार त्यांच्या मागे वेड्या सारखा लागला होता...त्याच आश्चर्य वाटत नाही...खालील छबी (मार्च १९४१मधली) बघितल्यावर त्या खळ्यांमध्ये खूप जणांनी गंटांगळ्या मारल्या असणार हे स्पष्ट होते...


'खळी 'मीनाक्षी

छायाचित्रकार - मला माहित नाही कारण त्यांचा उल्लेख अंकात दिसला नाही 

 सौजन्य : वाङ्मय-शोभा, मार्च १९४१

(अंकाची किंमत पहा... २ आणे = १२ पैसे!)