Thursday, July 03, 2014

साहित्य, चित्र, शिल्प, नेपथ्य, टीका, भाषा, स्थापत्य : द. ग. गोडसे...D G Godse @100


Today July 3 2014 is 100th Birth Anniversary of D G Godse- one of the greatest artists India produced in 20th century and one of the inspirations for this blog

वसंत पाटणकर:

"...मराठीत कलाविषयक लेखन, सिद्धान्तन करू पाहणारे बहुधा सहित्यसमीक्षक असतात. त्यांना साहित्याचे जसे आतून ज्ञान असते तसे ते इतर कलांचे सामान्यतः नसते. अन्य कलांचे आतून ज्ञान असणार्या समीक्षकांनी केलेले कलाविषयक लेखन कलेच्या स्वरुपावर काही वेगळा प्रकाश टाकण्याची शक्यता असते. गोडश्यांचे लेखन हे या दुसर्या प्रकारातील असल्यामुळेच ते अभिनव ठरते. दुसरे असे की साहित्य, चित्र, शिल्प अशा अनेकविध कलांची काही विचारसूत्रांत बांधणी करू पाहणारी मोठ्या आवाक्याची समीक्षा मराठीत जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे गोडश्यांचा कलामीमांसेचा हा प्रयत्न महत्वपूर्ण आहे...."

["D.G. Godse Yanchi Kalamimansa" Editor; Sarojini Vaidya, Vasant Patankar , 1997 ("द. ग. गोडसे यांची कलामीमांसा" संपादक: सरोजिनी वैद्य, वसंत पाटणकर)]


बाळ ठाकूर:

"...चित्र माणसाचं असो वा प्राण्याचं , गोडसेंच्या चित्रांतली त्यांची अॅनाटॉमीही पाहण्यासारखी असायची. गोडसेंचा घोडा तर खासच! आजवर घोड्याची अनेक चित्रं काढली गेली असतील , पण गोडसेंइतका परफेक्ट घोडा क्वचितच कुणी काढला असेल..." 

विजया मेहता: 

"… गोडसे विविध विषयांतले एन्सायक्लोपीडिया तर होतेच; त्याचबरोबर माझ्यासाठी ते थोरल्या भावासारखे एक वडीलधारी व्यक्ती होते.. माझ्याकरता एक भक्कम सपोर्ट सिस्टम! तसंच ते निव्वळ नेपथ्यकार वा वेशभूषाकार नव्हते, तर एक चौफेर 'सेन्शुअस' व्यक्तिमत्त्व होते…" 
 
द ग गोडसे: 

"...रायगडावरचे जगदीश्वराचे मंदिरसुद्धा थाटघाटात यावनी दर्ग्याच्या घराण्याचे दिसते ते मंदिराला दर्ग्याचा घाट देण्यास, मंदिर बंधणारांना त्या काळी कोणताही संकोच वाटला नाही म्हणून..." ('शक्ति सौष्ठव', 1972)

"...तरीही  तिचे  (मस्तानीचे) भविष्य  उज्ज्वल  आहे! ते जमेल  तेवढे  उज्ज्वल  करावे  हाच माझा ध्यास असल्यामुळे  माझे 'मस्तानी' हे पुस्तक …" (from a letter to me dated c October 1991)

There have been numerous entries referring to the late Mr. Godse on this blog.

I have put all of them together here: (Facebook page created by me) "D G Godse, A Search शोध, द. ग. गोडसेंचा". I have also put there links and references to a few articles on him by others. 

I feel sorry that we still don't have even a lousy biography of him. 

I consider myself singularly lucky that I could exchange a few letters with him and that I received encouragement from him to write.


Artist: D G Godse,  c 1989 and James McNeill Whistler c 1890-1899